शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाल स्वास्थ्य योजनेत ई-निविदा व्यतिरिक्त वाहनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:38 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अमरावती जिल्ह्यात वाहने पुरवण्याबाबत ई-निविदा सन २०१६-१७ मध्ये काढण्यात आली. हीच ई-निविदा सन २०१८ साठी लागू करण्यात आली.

चेतन घोगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अमरावती जिल्ह्यात वाहने पुरवण्याबाबत ई-निविदा सन २०१६-१७ मध्ये काढण्यात आली. हीच ई-निविदा सन २०१८ साठी लागू करण्यात आली. मात्र, त्यातील बहुतांश वाहने निकामी व परवाना संपलेली आढळून येत आहेत. त्यामुळे ई-निविदाव्यतिरिक्त वाहनांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी पथक १, २ व ३ साठी एकूण ३४ वाहनांची ई-निविदा सन २०१७ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मागविण्यात आली होती. परंतु, ही निविदा एक वर्षात तीन वेळा बदलण्यात आली. पहिली निविदा ३ जानेवारी २०१७, दुसरी २७ जानेवारी २०१७, तिसरी ११ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आली. या निविदेत एकूण ३४ वाहने पुरविण्याचा करार रत्नम टूर्स अँड ट्रान्सपोर्टचे मालक समीउद्दीन वाहोउद्दीन सैयद (रा. कॉटन मार्केट, परतवाडा) यांना देण्यात आला होता. पत्र क्र. ३५४ दि. १२-१-२०१७ व पत्र क्र. १९ जानेवारी २०१७ नुसार रत्नम टूर्स अँड ट्रान्सपोर्ट यांना सुधारित वाहनांचे वेगवेगळे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले. २०१७ चा ई-निविदा आदेश ३४ वाहनांचा असतानाही पुन्हा त्यालाच सुधारित आदेश का देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ई-निविदाधारक वाहन पुरवण्यास अपात्र असल्याचे दिसून येत असले तरी ई-निविदा रद्द करण्यात आली नाही.चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकरिता ३ जानेवारी ते ३० आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांच्या कार्यकाळात केने नामक व्यक्तीचे वाहन वापरण्यात असल्याचे दिसून येत आहे. भातकुली तालुक्यातसुद्धा असाच प्रकार उघडकीस आला आहे. तिवसा, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, भातकुली, उपजिल्हा रुग्णालयात खासगी वाहनांचा वापर होत असल्याच्या उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व ई-निविदाधारक यांच्यात ‘मधुर’ संबंधातून आर्थिक व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. ई-निविदेतील ३४ पैकी काही वाहनांचा रोड टॅक्स, इंश्युरन्स व इतर महत्त्वाच्या बाबी आरटीओ कार्यालयात जमा नाहीत, हे उल्लेखनीय.काही वाहनांची खोटी कागदपत्रे?राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात वापरण्यात आलेले ३४ वाहनांपैकी काही वाहनांची खोटी कागदपत्रे अमरावती येथील आरटीओ एजंटमार्फत बनविल्याची खात्रीशीर माहिती आहे. ते या ई-निविदामध्ये वापरण्यात आले आहे.महिन्याला वाहनामागे एक हजार रुपयेई-निविदाधारकाला ज्यांनी आपले वाहन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमात चालवण्यास दिले, त्यांना वाहनचालकाकडून दरमहा एक हजार रुपये रोख प्राप्त होत असल्याचे एका वाहनमालकाने नाव अप्रकाशित ठेवण्याच्या अटीवर सांगितले.ई-निविदामध्ये दिलेल्या वाहनाव्यतिरिक्त जर दुसरे वाहन वापरण्यात येत असेल, तर चौकशी करून ई-निविदा ज्यांनी घेतली असेल, त्याच्यावर कारवाई करू.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक अमरावती