शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थश्रेणी निवासस्थानाचा अनधिकृत व्यक्तींद्वारा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:01 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानालगत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा अनधिकृत व्यक्तींद्वारा वापर होत आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यलय व बांधकाम विभाग मात्र एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत आहे. याविषयी कारवाई न केल्यास सदर निवासस्थानांचा जाहीर लिलाव करू, असा इशारा डेमॉक्रॅटिक युथ फ्रंटद्वारा देण्यात आला.येथील बायपास मार्गावर असणाऱ्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ...

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : विभागीय आयुक्त, बांधकाम विभागाकडून टोलवाटोलवी

आॅनलाईन लोकमतअमरावती : विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानालगत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा अनधिकृत व्यक्तींद्वारा वापर होत आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यलय व बांधकाम विभाग मात्र एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत आहे. याविषयी कारवाई न केल्यास सदर निवासस्थानांचा जाहीर लिलाव करू, असा इशारा डेमॉक्रॅटिक युथ फ्रंटद्वारा देण्यात आला.येथील बायपास मार्गावर असणाऱ्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या निवासास्थानालगत असणाऱ्या चतुर्थश्रेनी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये कायम शासकीय सेवेत नसलेले, मूळ अमरावतीला कायम निवासी असलेले अनेक कुटुंबे अनधिकृतपणे राहत आहेत. याशिवाय कुठल्याच प्रकारचा घरभाडे भत्ता, वीजबिल व पाणीबिलाचा भरणा न करता शासकीय निवासस्थानाचा उपभोग घेत असल्याची तक्रार डेमॉकॅ्रटिक युथ फ्रंटद्वारा बांधकाम व महसूल विभागाचे सचिवांकडे करण्यात आली आहे. या विभागाचे अधिकाºयांच्या वरदहस्तानेच गेल्या दोन दशकापासून शासनाला चुना लावण्याचा प्रकार बिनबोभाट सुरू आहे.ही शासकीय निवासस्थाने अनधिकृत व्यक्ती वापरीत असल्याने ती तत्काळ रिक्त करण्यात यावीत, या दोषी व्यक्तीवर गुन्हे नोंदविण्यात यावे व त्या व्यक्ती राहत असल्याचे दिनांकापासून घरभाडे भत्ता, पाणीबिल, वीजबिल, आदी वसूल करण्यात यावे, अशी मागणी फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष भूषण गवई यांनी महसूल व बांधकाम विभागाकडे केली आहे.निवासस्थान वाटपाची जबाबदारी कुणाची?या शासकीय निवासस्थानात कायम शासकीय सेवेत असणारे कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळेच या शासकीय निवासस्थानाचा वापर हा अनधिकृत ठरतो. यापूर्वी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी तक्रारीवरून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र दिले होते. मात्र, त्यांनी निवासस्थानाची देखभाल दुरूस्ती आम्ही करतो, वाटप नाही, असे स्पष्ट करीत पुन्हा विभागीय आयुक्त कार्यलयाकडे अंगुलीनिर्देश केला. त्यामुळे निवासस्थाने वाटप कोण करतो, हा प्रश्न निर्माण झाला आहे.