शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

अवैध रेती तस्करीत टिप्परऐवजी ट्रॅक्टरचा वापर

By admin | Updated: February 6, 2016 00:16 IST

तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधाण आले आहे. रेती तस्करांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

भरारी पथकाची भीती : आडमार्गाने वाहतूक सुरू, शासनाचा महसूल बुडतोयवरूड : तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधाण आले आहे. रेती तस्करांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले होते. परंंतु तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी भरारी पथक तयार करून रेती तस्करांना सळो की पळो करून सोडले. एका रेती तस्करावर कारवाई झाल्याने रेती चोरट्यांनी पुन्हा शक्कल लढवून टिप्परऐवजी ट्रॅक्टरने आडमार्गाने रेती वाहतूक सुरू केली आहे.मध्यप्रदेशातून कन्हान रेतीची मोठया प्रमाणात विक्री केली जात असून क्षमतेपेक्षा अधिक अवैध रेतीची तस्करी पहाटे तसेच रात्रीतून केली जात आहे. सध्याचे रेती विक्रेते अल्पावधीतच कोेट्यधीश झाले असून अवैध गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. याला आळा घालण्यास तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी भरारी पथकाच्या मदतीने धाड टाकून लाखो रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा केला. मात्र रेती तस्करांनी यालाही न जुमानता अवैध रेती तस्करीचा प्रयत्न सुरुच ठेवला. यामुळे चोरट्या मार्गाने रेती वाहतुकीचा प्रयत्न होत असताना मंगळवारी रात्री मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरुन विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर पुसला तलाठी जयंता भालाधरे आणि कोतवाल सुनील भाजिखाये यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. यामध्ये रेती तस्कराला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर पुन्हा रेती तस्करांनी शक्कल लढवून पुसला, देऊतवाडा, वाडेगाव, काटी वघाळ परिसरातून रेती तस्करी सुरु केली. मध्यप्रदेशातून येणाऱ्या रेतीला टिप्परऐवजी टॅ्रक्टरने वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील केवळ दोनच रेती घाट विकले गेल्याने उर्वरित रेतीघाटावरून रात्रीतून रेती चोरी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)