शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

जलस्तर उंचविण्यासाठी अचलपूर तालुक्यात नदी नांगरण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:48 IST

जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचे प्रयोग होत आहेत. याद्वारे नदीचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल व जलस्तर उंचावून परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : पुराचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरणार

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचे प्रयोग होत आहेत. याद्वारे नदीचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल व जलस्तर उंचावून परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी व्यक्त केला.जलयुक्तच्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर तालुक्यातील गावांचा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. अचलपूर तालुक्यातील जलालपूर, देवगाव परिसरातील चंद्रभागा नदीत जेसीबी आदी यंत्राद्वारे नदी नांगरण्याचा प्रयोग होत आहे. नदीच्या पात्राची जमीन सखोल नांगरली जात आहे. नदीच्या दोन्ही काठांदरम्यानचा भाग संपूर्ण सखोल नांगरल्यामुळे पुराचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल. त्यामुळे जलस्तर उंचावून पाणीटंचाईपासून दिलासा मिळेल. नदीलगतच्या विविध गावांना, शेतशिवाराला त्याचा फायदा होईल व कृषी उत्पादकताही वाढेल, असे नवाल यांनी सांगितले.जिल्ह्यात इतरही ठिकाणी जिथे पुराच्या शक्यता आहेत किंवा पाणी वाहून जाण्याचे मोठे प्रमाण आहे, तिथे अशी कामे विनाविलंब चालू करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनेक ठिकाणी गाळ साचून नदीचे पात्र उथळ होते. पुराचे प्रमाण वाढते. अशाठिकाणी ही कामे तत्काळ करावीत. या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले. राजुरा शिवार, नारायणपूर परिसरात जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट नाला बांधाच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली. या बंधाऱ्यामुळे १३९ हेक्टर जमिनीला लाभ होईल.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावकºयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिसरातील काही गावे ‘पोकरा’मध्ये समाविष्ट आहेत. तेथील कामांचीही माहिती त्यांनी घेतली. बोरगावपेठ या गावाला भेट देऊन त्यांनी खरीप कर्ज वितरण, विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली व तेथील गावकºयांशी संवाद साधला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी