शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चिखलदऱ्याच्या आमपाटी प्रकल्पात लाल मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:09 IST

तालुक्यातील गांगरखेडा येथे मागील सहा वर्षांपासून रखडत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आमपाटी प्रकल्पात अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. काळ्याऐवजी चक्क लाल मातीचा वापर सुरू असल्याने प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची तक्रार करण्यात आली आहे

ठळक मुद्देनिकृष्ट कामाची तक्रार : अधिकारी ठेकेदाराचे संगनमत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील गांगरखेडा येथे मागील सहा वर्षांपासून रखडत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आमपाटी प्रकल्पात अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. काळ्याऐवजी चक्क लाल मातीचा वापर सुरू असल्याने प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची तक्रार करण्यात आली आहेआदिवासींच्या शेतजमिनींवर सुरू असलेल्या गांगरखेडा येथील आमपाटी प्रकल्पाचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्या जात असल्याची तक्रार हतरु जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या पुजा राहुल येवले यांनी केली आहे. सदर प्रकल्पात हार्टिंग झोनमध्ये काळी माती न टाकता तेथीलच लाल माती ,मुरूम व दगडाचा वापर करण्यात येत आहे. पाणी टाकून रोलरने दबाई किंवा पिचिंग करणे आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसविल्या जात आहे.प्रत्येक वेळी तपासणी करणे आवश्यक असताना प्रकल्पाच्या वेस्टवेअर झोनमध्ये वापरण्यात येणारी रेती पांढरी व बारीक असून ती मध्यप्रदेशातून आणली जात आहे. यासंदर्भात तक्रार देऊनही संबंधित अधिकारी कुठल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने संगनमताने हा अपहार सुरू असल्याची तक्रार विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी कारवाई न केल्यास येवले मंत्रालयात तक्रार करणार आहेत.आमपाटी प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे आही.संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी. काळ्याऐवजी लाल मातीचा वापर व नियम गुंडाळून काम सुरू असल्याची तक्रार केली.- पूजा राहुल येवलेजि. प. सदस्य हतरुप्रयोगशाळेनुसार माती योग्य आह.े अहवाल उशिरा आल्याने जि. प. सदस्यांच्या दोन्ही पत्राची उत्तरे दिली नाही. प्रकल्पस्थळी भेट दिली .काम योग्य प्रकारे सुरू आहे- सुनील राठीकार्यकारी अभियंतापाटबंधारे प्रकल्प