अमरावती : शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती याशिवाय याबाबत टिकाही केली जात असल्याने यावर मार्ग काढत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कमी वेळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस सुविधा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे साधारपणे तिन आठवडयात विद्यार्थ्याना पाठपुस्तके उपलब्ध करून दिली जाणाचा प्रयन्न शासनामार्फत केला जाणार आहे.प्रत्येक जिल्हयातील तालुका स्तरावरून विद्यार्थ्याची आकडेवारी प्रशासनापर्यत लवकर न येणे , पुस्तक वितरणासाठी वाहतुक लवकर उपलब्ध न होणे .पुस्तक वितरणासाठी दिरंगाई होणे, पुस्तकांची छपाई वेळेवर न होणे अशा विविध कारणांमुळे पाठपुस्तकांचे वितरण रखडले जात होते. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी ऐवजी थेट जुलै आॅगस्ट महिन्यात पुस्तके मिळत होती. ही बाब झाल्याने शासकीय धोरणालाही अपयश स्विकारावे लागत होते . त्यामुळे नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन यासाठी काही प्रशासकीय सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता शिक्षण विभागातील निवडक अधिकाऱ्यांचे ई गव्हर्नस बाबत तिरूअनंतपुरम येथे प्रशिक्षण पार पडले आहे. या प्रशिक्षणासाठी २५ अधिकाऱ्यांची चमु सहभागी झाली होती .वेगवेगळया विषयावर पार पडलेल्या या प्रशिक्षणात पुस्तक वाटपाबाबतच्या विषयावर मागदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना पुस्तके पोहचविण्यासाठी साधारणपणे १२६ दिवसाचा कालावधी लागतो. तो २४ दिवसापर्यत होऊ शकतो. यासंदर्भात दिलेल्या माहिती वरून शालेय विद्यार्थ्यांपर्यत पुस्तके कमी कालावधीत पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस प्रणालीचा उपयोग केला जाईल अशी माहिती आहे. प्रशिक्षित अधिकाऱ्यामार्फत जिल्हा स्तरावरही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहोचविण्यासाठी ई-गव्हर्नर्सचा प्रयोग
By admin | Updated: October 25, 2014 02:07 IST