शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर

By admin | Updated: April 15, 2016 00:18 IST

आंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात.

आरोग्य धोक्यात : अतिवापर धोकादायक, दोषींवर कारवाईची गरजसंदीप मानकर अमरावतीआंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात. याची महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु केळी पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. वृध्दांसह लहान मुले केळी आनंदाने खातात. परंतु यापासून पोटात विष जातो, याची त्यांना काय माहिती? अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार फळे पिकविताना कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणे गुन्हा आहे. परंतु नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या फळविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने रोज नागरिकांना विष पाजले जात आहे. यामुळे घशाचे आजार होतात. तसेच कर्करोग, किडनी व लिव्हर निकामी होतात. मेंदूचे आजार, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, पोटाचे विकार आदी आजार अशा फळांच्या माध्यमातून होतात. सोमवारी 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी बाहेर तयार केलेल्या इथेलिन गॅसच्या स्प्रेचा वापर फळे पिकविण्यासाठी करण्यात येत आहे. कॅल्शियम कार्बाईडची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन अ‍ॅसिटेलीन गॅस तयार होतो. त्यापासून कमी दिवसांत केळी पिकविली जातात. यामुळे आरेसनिक फॉस्फरस हायड्राईड तयार होते. यानंतर नॅचरली इथेलिन गॅस तयार होतो. या गॅसचे ३३ टक्केपेक्षा जास्त प्रमाण असेल तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. हा गॅस आरटिफीशयली बाहेर तयार करून तो फळे पिकविण्यासाठी वापरता जातो. फळे विके्रत्यांकडे ठिकठिकाणी स्प्रेच्या बॉटल आढळतात. ते कॅमेराबंद झाले आहे. परंतु त्या बॉटलमध्ये पाणी असल्याचे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. हा जीवघेणा प्रकार अंबानगरीत होत असताना अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांमध्येही या संदर्भाची जनजागृती होत नाही. त्यामुळे एरवी फळांतून व्हिटॅमीन अ, ब, क स्तर मिळतात. त्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात विविध फळे व केळी नागरिक महागड्या दरात विकत घेतात. परंतु या चविष्ट केळीसोबत आपल्याला विष विकले जात असल्याची त्यांना कल्पनाही नसेल. फळे व केळी पिकविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्बाईड व इथेलिनचा वापर अतिशय घातक असून ते मानवी आरोग्याला अपायकारक असल्याचे मत रसायनशास्त्रज्ज्ञ अमोल डोले यांनी व्यक्त केले. अन्न विभाग झोपेतच ! लोकांच्या आरोग्याच्या चिंधळ्या उडविले जात आहे. मात्र ज्या अन्न प्रशासन विभागाकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे व त्यांच्यावर यासंदर्भाचे नियंत्रण आहे. तो विभाग गप्प का, असा सवाल अंबानगरीची जनता विचारत आहे. अन्न प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी झोपेतच असल्याची चर्चा आहे. त्यांनी फळे विक्रेत्यांचे परवाने तपासून धाडी टाकून केळी व इतर फळांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे गरजेचे आहे. म्हणजे सर्व सत्य बाहेर निघेल.कॅल्शियम कार्बाईडचा वापर हा केळी पिकविण्यासाठी करणे अतिशय घातक आहे. तसेच इथेलीन गॅसचा वापर हा ३३ टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते आरोग्यासाठी हानीकारक आहे. - अमोल डोले,रसायनशास्त्रज्ञ, दर्यापूरइथेलीन गॅसचा वापर करणाऱ्यावर बंदी नाही. पण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक वापर होतो का, हे तपासावे लागेल. मात्र कार्बाईडचा फळे पिकविण्यासाठी वापर होत असेल तर अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येतील. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग