शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

‘उर्ध्व वर्धा’चे भूकंपमापक यंत्र दोन वर्षांपासून बंद (लोगो)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST

गजानन मोहोड अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात रविवारी सौम्य भूकंप झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात काय स्थिती आहे. यासाठी संपर्क साधला असता, ...

गजानन मोहोड

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात रविवारी सौम्य भूकंप झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात काय स्थिती आहे. यासाठी संपर्क साधला असता, यंत्र (सेस्मोमीटर) दोन वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. येथे डिजिटल स्वरुपातील नवे यंत्र बसविण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात ४.४ रिश्टर स्केल असलेला सौम्य स्वरूपाचा भूकंप रविवारी सकाळी ८.३३ वाजता झाला. त्यानंतर अनेकांनी उर्ध्व वर्धा विभागाकडे पार्डी येथील केंद्रावर काय नोंद झाली. याची विचारणा केली असता, हे यंत्र दोन वर्षांपासून बंदच असल्याची माहिती समोर आली. सुमारे ३० वर्षांपू्र्वी हे सेस्मोमीटर पार्डी येथे कार्यान्वित करण्यात आले होते. या यंत्राद्वारे किमान पाच हजार किमी परिसरात कुठेही भुकंप झाल्यास त्यांची नोंद घेतल्या जायची. मात्र, आता ते कालबाह्य झाल्याने या यंषात बिघाड झाल्यास त्याचे सुटे पार्ट मिळत नाही व प्रत्येक वेळी नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेकडे घेवून जाणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे या विभागाद्वारा तंत्रज्ञालाचा येथे बोलावून दुरुस्तीचा प्रयत्न केला गेला. आता हे सेस्मोमीटर बदलण्यात येऊन जागतिक बँकेच्या ‘ड्रिप-२’ प्रकल्पात बदलण्यात येणार आहे. तसा प्रस्तावदेखील नाशिक येथील संबंधित संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती केंद्रांचे अभियंता गजानन साने यांनी दिली.

तीन वर्षांपूर्वी धारणी तालुक्यातील तीन-चार गावांत धरणीकंपामुळे घरातील भांडी पडण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भूकंपाची धास्ती होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उर्ध्व वर्धा विभागाकडे भूकंप नोंदीची मागणी केली. तेव्हाही यंत्र बंद असल्याने त्यांनीदेखील नव्या यंत्रासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रक्रिया थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते.

बॉक्स

चौकीदार सांभाळतो केंद्र, घेतो नोंदी

या प्रकल्पाचे पार्डी येथील सेस्मोमीटरच्या केंद्रांवर असलेला चतुर्थश्रेणी कर्मचारी व चौकीदार व्यक्ती हे भूकंपमापक केंद्र सांभाळत असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. याशिवाय भूकंपाच्या नोंदी घेण्याचे कामदेखील चौकीदारामार्फतच केले जात आहे. स्टॉफ कमी असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे या विभागाने सांगितले.

बॉक्स

डिजिटल सेस्मोमीटर बसविणार

सध्या अस्तित्वात असलेले भूकंपमापक यंत्र कालबाह्य झालेले आहे व नादुरुस्त आहे. त्यामुळे हे यंत्र बदलण्यात येऊन डिजिटल यंत्र बसविण्यात येणार आहे. याासाठी किमान ४० ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे व तो कुणी करायचा, यावरुन हे प्रकरण रेंगाळले आहे. आता जागतिक बँकेच्या ‘ड्रिप-२’ प्रकल्पांतर्गत यंत्र बदलण्यात येत आहे. तसा प्रस्ताव उर्ध्व वर्धा विभागाद्वारा संबंधित यंत्रणेकडे पाठविला आहे.

बॉक्स

मोबाईललाही अटॅच होणार यंत्र

केंद्रांवर बसविण्यात येणारे नवे डिजिटल यंत्र हे मॅन्युअली राहणार नाही. हे यंत्र मोबाईललाही अटॅच होणारे आहे. त्यामुळे कुठेही भूकंप झाल्यास लगेच माहिती पडणार आहे. यासाठी ‘डॅम रिहॅब्युटेशन इप्रुमेंट प्रोग्राम’ (ड्रीप-२) मध्ये ५० रुपये लाख किमतीचे हे यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे पाच हजार किमी अंतरातील भूकंपाची नोंद होणार आहे.

कोट

केंद्रावरील यंत्र रिप्लेसमेंट करण्यात येणार आहे. यासाठी नाशिकच्या संबंधित संस्थेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.

- रश्मी देशमुख,

अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा

कोट

सर्व तहसीलदारांना रविवारी सकाळी सूचना देऊन माहिती मागविली आहे. अमरावती जिल्ह्यात कुठेही तसे धक्के जाणवले नाहीत.

- नितीन व्यवहारे,

निवासी उपजिल्हाधिकारी