शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाळात रुतले अप्पर वर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:50 IST

जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत.

ठळक मुद्देकेवळ २२ टक्के जलसाठा : धरण गाळमुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत. त्यामुळे या धरणातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणातील अल्प जलसाठ्यामुळे एकीकडे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असताना, तालुक्यातील अनेक गावांवर पाणीसंकट कोसळले आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ६७८.२७ दशलक्ष घनमीटर असून, तूर्तास धरणात २३८.४६ दलघमी पाणी असले तरी त्यापैकी केवळ १२४.२४ ( २२ टक्के) जलसाठा पिण्यासाठी उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने गाळ काढण्याची व खोलीकरणाची मागणी समोर आली आहे. मोर्शी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस कोसळल्याने पाण्याची पातळी खोल गेली. भूजलाचा बेसुमार उपसा झाल्याने भूगर्भाची चाळण झाली. विहिरी, बोअर आटल्या. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या संत्राबागा टँकरच्या पाण्यावर जगवित आहेत. अप्पर वर्धा धरणातून ७० गावांना पाणीपुरवठा केला जातो. अमरावती व मोर्शीकरांची तहानसुद्धा याच धरणाच्या पाण्याने भागविली जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यात अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मोर्शी-अमरावतीकरांवर पाणी कपातीची वेळ येऊन ठेपणार आहे.धरणाच्या खोलीकरणाची कामे तातडीने व्हावीअप्पर वर्धा जलाशय हे मोर्शी व अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी उपयुक्त आहे. इतरत्र पाणी टंचाई असताना या धरणाने मात्र कधीही धोका दिला नाही. यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सध्या अप्पर वर्धा धरणात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण -गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत अप्पर वर्धा धरणातील गाळ काढण्यात येऊन पाणी साठवण्याच्या दृष्टीने धरणाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. आनंद घोंगडे, सचिव प्रमोद राऊत व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.