शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्याच्या अप्पर प्लेटोत अस्वलाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:13 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातील अप्पर प्लेटोस्थित पॉइन्टवर दिवसा अस्वलाने धुमाकूळ घातला असून

थरार : ठाकूर, प्रास्पेक्ट पॉर्इंटवर पर्यटकांची गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातील अप्पर प्लेटोस्थित पॉइन्टवर दिवसा अस्वलाने धुमाकूळ घातला असून मोबाईलमध्ये छायाचित्र काढण्याच्या नादात काही फूट अंतरावर पर्यटकांची धावपळ जीवघेणी ठरल्याचे चित्र आहे. चिखलदरा व परिसरातील जंगलामध्ये अस्वालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरोज दुपारी ३ वाजता नंतर पर्यटनावरील हरिकेन, ठाकुर, प्रॉस्पेक्ट पाइन्टसह रेंजर कॉलेज परिसरात अस्वल त्यांचे पांच-सहा पिल्ले दिसत असल्याचे चित्र आहे. अस्वल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह चिखलदरा पर्यटनसाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून काहींची अतिशयोक्ती कृत्य जीवघेणे ठरण्याची शक्यता बळावली आहे. मोठ्याने ओरडत, दगडांचा मारा उपरोक्त पॉइन्टवर अस्वलांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करण्यासोबत दऱ्या खोऱ्यात लांब दिसणाऱ्या अस्वलांना बघून मोठ्याने ओरडत, त्या दिशेने दगड व मिटकावन्याचे कृत्य काही पर्यटक व स्थानीय अस्वलास पाहण्यासाठी येणारे नागरिक करीत आहे. मंगळवारी हा प्रकार पाहून वनविभाग आणि पोलिसांनी पॉइन्टवरील उपस्थिताना हुसकाहून लावले होते. मोबाइलने सेल्फीचा जिवघेणा मोह वाघा पेक्षा हिस्त्र प्राणी म्हणून अस्वलाची ओळख आहे. मनुष्य दिसताच त्याच्या डोक्यासह तोंडाला तीक्ष्ण नखाने ओरबडून जिवघेणा हल्ला करते. मेळघाटात दरवर्षी किमान वीस ते पंचवीस घटना घडतात, असे असताना अस्वलास पाहण्यासाठी येणारे काही अति उत्साही पर्यटक ‘लोखंडी’ कठड्याखाली उतरून दरीतील अस्वलासोबत मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा जीवघेणा थरार करीत आहे. प्रत्येक पॉइन्टवर असलेले सुरक्षा कठडे ओलांडण्याची सक्त मनाई आहे. अनेक पर्यटकांचा खोऱ्यात पाय घसरून अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, हे विशेष.