शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

पत्रकार भवनाच्या कोनशिलेचे अनावरण

By admin | Updated: July 20, 2015 00:15 IST

पे्रस क्लब आॅफ अमरावतीच्या पत्रकार भवनाचा कोनशीला अनावरण सोहळा रविवारी येथील वालकट कम्पाउंड परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडला.

प्रेस क्लबचा कार्यक्रम : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा गौरवअमरावती : पे्रस क्लब आॅफ अमरावतीच्या पत्रकार भवनाचा कोनशीला अनावरण सोहळा रविवारी येथील वालकट कम्पाउंड परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडला. याप्रसंगी ३० वर्षे पत्रकारिता करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा भावपूर्ण गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. मंचावर पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आमदार रवी राणा, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, महापौर चरणजित कौर नंदा, प्रेस क्लब आॅफ अमरावतीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, भाजपाचे शहर अध्यक्ष तुषार भारतीय उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची आत्महत्या ही बातमी आहे. मात्र आत्महत्येनंतर त्या कुटुंबाची अवस्था काय, गावाची स्थिती काय, पुन्हा आत्महत्या होऊ नये म्हणून काय करायला हवे, या बातम्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. अशा बातमीदारीमुळे ती समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी ठोस प्रयत्न होतात. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्या जातात. मात्र विमानतळाच्या असुविधेने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची गैरसोय होते. त्यामुळे येथे विमानतळ झाल्यास मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येतील व पुण्या-मुंबईत नोकऱ्या करणारे लाखो युवक पुन्हा विदर्भात परततील. दमदार उद्योग व कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद अमरावती जिल्ह्याला द्या, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी केले. प्रास्ताविक अनिल अग्रवाल, संचालन किशोर फुले यांनी केले. यावेळी शहर व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांचे भाकित खरेजिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सकाळी सायंटीफिक एक्सप्लेनेशन दिले. आज पाऊस येतोच, असे ते म्हणाले. मी म्हणालो तुमचे म्हणणे खरे व्हावे. आज पाऊस आला. वेधशाळेचा अंदाज कधीच खरा ठरत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे भाकित तातडीने खरे ठरले. जिल्हाधिकाऱ्यांना हवामान खाते घेऊन तर जाणार नाही ना, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली आहे, असा विनोद मुख्यमंत्र्यांनी केला. अमरावतीचा देशाला हेवा वाटतोअमरावतीचा देशाला हेवा वाटावा, असे भरीव कार्य क्रिडा क्षेत्रात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आहे. कबड्डीला खासी प्रतिष्ठा बहाल करण्याचे श्रेय या मंडळाकडे जाते, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला. ३० वर्षे अविरत सेवा देणाऱ्या पत्रकारांचा गौरवसतत ३० वर्षे समाजाचा सजग प्रहरी म्हणून सेवा देणाऱ्या उल्हास मराठे, नवीनचंद्र शहा, चेतन पसारी, अशरफभाई, रोहितप्रसाद तिवारी, गिरधर देशमुख या ज्येष्ठ पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.