शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचे नुकसान, २.९१ कोटींचे अनुदान मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

अमरावती : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानबदल होऊन जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी वादळी पाऊस झाला. यात काही तालुक्यात ...

अमरावती : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानबदल होऊन जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी वादळी पाऊस झाला. यात काही तालुक्यात घरांच्या पडझडीसह फळपिकांचे नुकसान व गुरे दगावली होती. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी मदतनिधीची मागणी शासनाकडे केली होती. आता बुधवारी एसडीआरएफच्या अनुदानाचा शासनादेश काढण्यात आला. या नुकसानीसाठी जिल्ह्याला वाढीव दराने २ कोटी ९१ लाख २१ हजारांची मदत येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

यामध्ये ५९६ घरांचे अंशत: नुकसान झाले. याकरिता प्रतिकुटुंब ५ हजार रुपये कपड्यांच्या मदतीसाठी व ५ हजार रुपये घरगुती भांडीकरिता मिळणार आहे. याकरिता ५९.६० लाख मंजूर करण्यात आले. पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्या ३३ घरांसाठी २.३० लाख, पूर्णत: पडझड झालेल्या ३३ घरांसाठी ४९.५१ लाखांचे अनुदान मिळणार आहे.

अमरावती तालुक्यात दोन व्यक्तींना दुखापत झाली यात २६ हजार, जिल्ह्यात १९४.७५ हेक्टरचे नुकसान झाले. यात जिरायती क्षेत्रात ११४ शेतकऱ्यांचे ८४.८२ हेक्टरकरिता १३,५०० रुपये, दोन हेक्टरच्या मर्यादेत ११.४६ लाख, बहुवार्षिक पिकांचे १०९ हेक्टरमध्ये २२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी १८ हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत १९.७८ लाख व एसडीआरएफचे ३५.१८ लाखांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास केली होती. त्यानुसार आता २.९१ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले.

बॉक्स

३३ निराधार कुटुंबांना १३.३९ लाख

या वादळामुळे वरूड व चांदूर बाजार तालुक्यातील ३३ कुटुंबे निराधार झालीत. या परिवारांना ३३० किलो गहू, ३३० किलो तांदूळ व ९.३४ कोटींचे अनुदान असे एकूण १३.३९ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली. यानुसार आता मदत देय राहणार आहे. साधारणत: पुढच्या आठवड्यात हा निधी विभागीय आयुक्तांना प्राप्त होईल. त्यानंतर जिल्ह्याला अनुदान वितरित करण्यात येईल.