शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नपुंसक पतीचे पत्नीशी अनैसर्गिक कृत्य, सासरा-दीराशी संबंध ठेवण्याचा किळसवाणा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:18 IST

मधुचंद्राच्या रात्री पती जवळ येत नव्हता. तिनेच पुढाकार घेतला. मात्र, आधी मित्र बनू, असे म्हणत पतीने वेळ टाळली. दहा दिवसानंतर पत्नीने हा घटनाक्रम सासरच्या मंडळीच्या कानावर टाकताच पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले.

ठळक मुद्देशिक्षक पतीसह तिघांना अटकसासरा, दीरासोबत संबंध ठेवण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मधुचंद्राच्या रात्री पती जवळ येत नव्हता. तिनेच पुढाकार घेतला. मात्र, आधी मित्र बनू, असे म्हणत पतीने वेळ टाळली. दहा दिवसानंतर पत्नीने हा घटनाक्रम सासरच्या मंडळीच्या कानावर टाकताच पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पतीला लैंगिक समस्या असल्यामुळे मूल कसे होणार, या विवंचनेत पत्नी होती. त्यातच सासरा व दीरासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला सासरच्यांकडून मिळाल्याने विवाहितेला धक्काच बसला. या गंभीर प्रकाराची तक्रार पीडितेने शुक्रवारी फे्रजरपुरा पोलिसांकडे नोंदविली असून, पोलिसांनी शिक्षक पतीसह सासरा व दिराला अटक केली.पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, फे्रजरपुरा हद्दीतील रहिवासी ३० वर्षीय तरुणीचा २४ सप्टेंबर २०१७ रोजी एका तरुणासोबत अकोला जिल्ह्यातील दहीहांडा येथे विवाह झाला. माहेरच्यांनी दोन लाख व सोन्याचे दागिने म्हणून सासरच्यांना हुंडा दिला. विवाहानंतर २७ सप्टेंबर रोजी सासरची मंडळी मुलीला घ्यायला आली. २८ सप्टेंबर रोजी नवदाम्पत्याची मधुचंद्राची रात्र होती. नववधू पतीच्या खोलीत गेली असता, तो हजर नव्हता. पत्नीने मध्यरात्रीपर्यंत पतीची प्रतीक्षा केली. अखेर मध्यरात्री २ वाजता पती खोलीत दाखल झाला. मात्र, तो पत्नीजवळ न जाता खोलीत पुस्तक वाचत बसला. हा प्रकार बघून पत्नी जवळ गेली आणि तिने पतीला स्पर्श केला. पती जोरात ओरडला. त्यामुळे सासरची मंडळी धावून आली. तिने समजावून सांगितले. त्यानंतर आपण आधी मित्र बनू आणि त्यानंतर पती-पत्नी, असे त्याने सांगितले. त्या दिवसापासून दिवाळीच्या सुट्यांमध्ये अमरावतीत आले. त्यावेळीसुद्धा ते दाम्पत्यजीवनात नव्हते.सासरा, दीराची वाकडी नजरविवाहितेने हा प्रकार सासरच्या मंडळीच्या कानावर टाकला असता, पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर नवदाम्पत्य अकोट येथे राहायला गेले. तेथील एका शाळेवर ती मुलगी शिक्षिका आहे.यादरम्यान लग्नात आंदण दिले नाही म्हणून सासरची मंडळी तिला टोमणे मारून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. याच सुमारास पतीला लैंगिक समस्या असल्याचे पत्नीला कळले. हा प्रकार तिने सासरच्यांना सांगितले. मला मूल हवे, असे सांगितले असता, कुटुंबातील एका सदस्याने सासरा व दीर मूल देतील, असे सांगितले. त्यानंतर सासरा व दीर हे दोघेही तिच्याशी जवळीक साधू लागले. वाकड्या नजरेने तिच्याकडे पाहिले जात होते. एकदा त्यांच्याकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नदेखील झाल्याचे पीडितेने तक्रार म्हटले आहे. हा सर्व त्रास असह्य झालेल्या विवाहितेने अखेर बुधवारी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.याप्रकरणी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. गुन्हा दाखल करून पती, सासरा व दिरास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत संवेदनशीलतेने करण्यात येत आहे.- आसाराम चोरमले,पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुराअनैतिक संबंध लपवून तरुणीची फसवणूकआरोपी नागपूर येथील रहिवासीपतीसह कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्नापूर्वीचे अनैतिक संबंध लपवून एका तरुणाने लग्न केले. आपला विश्वासघात झाल्याचे कळताच तरुणीने फे्रजरपुरा पोलिसांत नागपूर येथील रहिवासी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार देण्यात आली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोलीस सूत्रानुसार, राहुल रेवकनाथ साळवे (३३), रेवकनाथ साळवे (७०), प्रभाकर सोनारे (६०), महेंद्र सोनारे (५५) व अमित पाटील (४५, सर्व रा. झिंगाबाई टाकडी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील प्रशांतनगरातील रहिवासी एका तरुणीचे राहुल साळवे याच्याशी लग्न ठरले. तरुणीच्या कुटुंबीयांना लग्नाचा सर्व खर्च करून वसंत हॉल येथे धूमधडाक्यात लग्न लावले. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी राहुलने मुलीकडे सहा लाख रुपये व ५२ ग्र्रॅम सोन्याचे दागिने मागितले. माहेरच्यांनी पैसे व दागिने दिले. ती तरुणी लग्न होऊन सासरी नागपूर येथे राहायला गेली. १९ मे ते २४ मे २०१७ दरम्यान ती तरुणी पतीसोबत राहिली. मात्र, पती जवळ येत नसल्याचे त्या तरुणीच्या लक्षात आले. तरीसुद्धा ती काही दिवस पतीच्या घरीच थांबली.दरम्यान, एकदा त्या तरुणीचे वडील मुलीला भेटायला नागपूर गेले. त्यावेळी मुलीला पतीने दोन दिवसांपासून जेवण दिले नसल्याचे कळले तसेच त्याचे पूर्वीच लग्न झाले आहे व त्याला दोन मुलेसुद्धा असल्याचे माहिती पडले. नवरा एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, त्यांना दोन अपत्ये असल्याचे पाहून आपला विश्वासघात झाल्याचे मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी मुलीसह अमरावती गाठून गुरुवारी फे्रजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४१९, ४०६, ४१७, ४६८, ४७१, सहकलम ३,४, हुंडा प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा नोंदविला.