कारवाई सुरू : अन्न, औषध प्रशासनाची कारवाई आरंभअमरावती : गैरछाप्याचे तसेच असुरक्षित खाद्यतेल बाजारात विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले. सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेल नमुने तपासणीत रिफाईंड सोयाबीन तेल व वनस्पती खाद्यतेलाच्या पॅकिंगवर गैरछाप्याचे असल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवून खाद्यतेल विक्रेत्यांकडील खाद्यतेलाचे नमुने गोळा केले होते. हे खाद्यतेल प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. या खाद्यतेलाच्या पॅकिंग डब्यावर गैरछापा असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न व सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद सिद्दीकी यांच्या पथकाने बडनेरा येथील निभोंरा (खुर्द) येथील एका खाद्यतेल विक्रेत्याजवळील तेलाची तपासणी केली. त्यामध्ये गैरछाप्याचे असल्याचे लक्षात आले. अन्न व औषधी प्रशासन विभागाने २६ हजार ६१६ किलो ग्रॅमचे खाद्यतेल जप्त केले आहे. पुढील कारवाईची सुरु होती.
अप्रमाणित खाद्यतेल बाजारात
By admin | Updated: November 15, 2015 00:09 IST