शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अन्यायकारक शासन निर्णयाची होळी

By admin | Updated: September 22, 2016 00:16 IST

विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा १९ सप्टेंबरच्या सुधारित शासन निर्णयाची बुधवारी होळी करण्यात आली.

शिक्षकांमध्ये संताप : शिक्षण उपसंचालकांना निवेदनअमरावती : विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा १९ सप्टेंबरच्या सुधारित शासन निर्णयाची बुधवारी होळी करण्यात आली. हा शासन निर्णय म्हणजे शिक्षकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडणारा असल्याची टिका शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली आहे.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात या शासन निर्णयाची होळी करुन शासनकर्त्यांच्या आश्वासनावर ताशेरे ओढण्यात आले. यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली. या सुधारित शासन निर्णयामध्ये विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या अन्यायकारक शासन निर्णयामध्ये सरसकट २० टक्के वेतनाची तरतूद आहे. मात्र अनुदान सुत्रानुसार पुढील टप्पा अनुदानाची तरतूद करण्यात आलेली नाही. अनुदान देण्यासाठी शाळेतील शेवटच्या वर्गातील पटसंख्या २० असली पाहिजे, असे नमूद आहे. जाचक अटी लादल्यामुळे हा शासन निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी झालेल्या बैैठकीत महाराष्ट्रातील १,६२८ घोषित शाळांचा समावेश करुन त्यांना २० टक्के वेतन अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत १६ वर्षांपासून वेतनासाठी लढा देणाऱ्या शिक्षकांना आशेचा किरण जागला होता. मात्र नव्या ‘जीआर’मध्ये लादलेल्या अटी, शर्थीमुळे एकही शाळा आता १०० टक्के अनुदानास पात्र ठरणार नाही, असा आरोप शेखर भोयर यांनी केला आहे. दरम्यान अन्यायकारक शासन निर्णयाची होळी करुन शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांच्यासह दिलीप कडू, प्रदीप नानोटे, अशोक लहाने, गजेंद्र गावंडे, विजय नागपुरे, ललित चौधरी, राजीक पठाण, सुनील डहाके, संगीता शिंदे, सिद्धार्थ सिरसाट, विजय कळस्कर, राजेश काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)