शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

विद्यापीठाचे संशोधन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:23 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मालकीची येथील रुख्मिणीनगरात जागा असून त्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र उभारण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपये निधी विद्यापीठाला मंजूर झाला असून, या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून अडीच कोटीचा निधी मंजूर : संशोधन, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मालकीची येथील रुख्मिणीनगरात जागा असून त्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र उभारण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपये निधी विद्यापीठाला मंजूर झाला असून, या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वी शासनास सादर करण्यात आला होता. त्याकरिता आमदार तथा उपाध्यक्ष, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ सुनील देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आमदार देशमुख यांनी सदर प्रस्तावास शासन दरबारी प्रयत्न करुन मान्यता मिळवून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहे.रुख्मिणीनगर स्थित पेट्रोल पंपाजवळील विद्यापीठाच्या मालकीच्या जागेवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरु व्हावे आणि त्याचा शहरातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी पुढाकार घेतला. त्याठीकाणी सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, सेमिनार हॉल, कार्यालय, क्युबिकल तसेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था राहणार आहे. अत्याधुनिक सर्वसोयीने सुसज्ज ही इमारत चार मजली राहणार आहे. संशोधन आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे.शहराच्या मध्यवस्तीत विद्यापीठाचे निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मंजुरी व निधी दिल्याबद्दल शासन तसेच आमदार देशमुख यांचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपुरकर, कुलसचिव अजय देशमुख यांनी आभार मानले आहे.