शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीतपणे प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:12 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांना बुधवारपासून सुरळीतपणे प्रारंभ झाला. ऑनलाईन परीक्षा ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांना बुधवारपासून सुरळीतपणे प्रारंभ झाला. ऑनलाईन परीक्षा ६ जूनपर्यंत घेण्यात येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. विधी, अभियांत्रिकी व फार्मसीच्या सुमारे ८५०० विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली.

विद्यापीठ संलग्नित ३८४ महाविद्यालयांच्या नियंत्रणात पाचही जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थी घरी बसून मोबाईल, लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवरून ही परीक्षा देऊ शकतील, अशी सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी महाविद्यालयात प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाठविली जात असून, ही प्रश्नपत्रिका महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना गुगल फार्मवर पाठविली जाते. त्याअनुषंगाने पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिकी त्रुट्या न उद्‌भवता ऑनलाईन परीक्षा व्यवस्थितपणे आटोपल्या. सकाळी १० ते ११, दुपारी १२ ते १, २ ते ३ आणि ४ ते ५ अशी चार शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे. दुपारी ४ ते ५ या दरम्यान विधी पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. विधी अभ्यासक्रमाचे ५००, अभियांत्रिकी ६ हजार, तर फार्मसीचे २ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावेळी विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी कोणतीही बाह्य यंत्रणा अथवा एजन्सी नियुक्त न करता या परीक्षांचे नियोजन केले आहे. त्याकरिता परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले आहे.

-------------------------

अशी झाली पहिल्या दिवशी ऑनलाईन परीक्षा

- अभियांत्रिकी सीजीएस, सीबीसीएस (तिसरे सत्र)

- विधी अभ्यासक्रम ५ वर्षीय (तिसरे, पाचवे, सातवे, नववे सत्र)

- विधी अभ्यासक्रम ३ वर्षीय (तिसरे, पाचवे सत्र)

- फार्मसी ( तिसरे, पाचवे, सातवे सत्र)

---------------------

आजपासून ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा

६ ते ११ मे या दरम्यान परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून वेळापत्रक कळविले जाणार आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेत यापूर्वी ज्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांना संधी मिळणार आहे. तसेच १२ मे पासून बी.ए.,बी.कॉम. शाखेच्या ऑनलाईन परीक्षांना प्रारंभ होणार आहे.

-------------------

बुधवारी पहिल्याच दिवशी चार शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा पार पडल्या. कोणतीही तक्रार अथवा तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या नाहीत. ६ जूनपर्यंत परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ