शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

विद्यापीठ लॅब परिसराला बॅरिकेडने वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:01 IST

आता केवळ विद्यापीठ लॅबला ‘आयसीएमआर’च्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यात झालेल्या चर्चेनुसार विद्यापीठ प्रयोगशाळा परिसराला बॅरिकेडने वेढण्यात आल्याची माहिती आहे. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असले तरी काही प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन कायम आहे. प्रयोगशाळा परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी हा परिसर बॅरिकेडने वेढण्यात आला आहे.

ठळक मुद्देनमुने तपासणीपूर्वीच दक्षता : कुलगुरू, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये चर्चेअंती निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोविड-१९ रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने चाचणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळेच्या परिसराला बॅरिकेडने वेढण्यात आले आहे. दक्षता म्हणून नमुने तपासणीपूर्वीच हा परिसर मंगळवारी सील करण्यात आला. अकोला येथील सर्वोपचार रूग्णालय व नागपूरचे ‘एम्स’पेक्षाही विद्यापीठात नमुने चाचणीसंदर्भात अतिदक्षता बाळगली जात आहे.विद्यापीठाची प्रयोगशाळा थ्रोट स्वॅब चाचणीकरिता सज्ज झाली आहे. गत आठवड्यापासून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नागपूरने विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीकरिता पाठविले आहे. या नमुन्यांचा अहवाल नियमितपणे विद्यापीठ ‘एम्स’कडे पाठवित आहे, तर दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) नमुने चाचणीच्या अनुषंगाने विद्यापीठात अद्ययावत सुविधा, मशीन, मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्रीची आॅनलाइन पाहणीसुद्धा केली आहे. आता केवळ विद्यापीठ लॅबला ‘आयसीएमआर’च्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यात झालेल्या चर्चेनुसार विद्यापीठ प्रयोगशाळा परिसराला बॅरिकेडने वेढण्यात आल्याची माहिती आहे. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असले तरी काही प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन कायम आहे. प्रयोगशाळा परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी हा परिसर बॅरिकेडने वेढण्यात आला आहे.दर तासाला १२ नमुने तपासणीची क्षमतासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात फॅबलॅबमध्ये थ्रोट स्वॅब नमुने तपासणीकरिता अत्याधुनिक मशीन, यंत्रसामग्री मागविण्यात आली. ही मशीन स्वयंचलित असून, दर तासाला १२ नमुने तपासणीची क्षमता असल्याची माहिती आहे. थ्रोट स्वॅब नमुने तपासणीच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत सुविधा आहेत. प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, प्रशांत गावंडे व त्यांची चमू अविरतपणे कार्यरत आहे.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रयोगशाळा परिसर बॅरिकेडिंग करण्यात आला आहे. या भागात बाहेरील व्यक्तींनी प्रवेश करू नये, दक्षता म्हणून उपाययोजना केल्या आहेत. तशा प्रकारे गाइड लाइन वगैरे नाहीत.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू

टॅग्स :universityविद्यापीठ