शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने स्वीकारले सामाजिक दायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:17 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व स्वीकारले. याकरिता कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली.

ठळक मुद्देकुलगुरू, कुलसचिवांचा पुढाकार : दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व स्वीकारले. याकरिता कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली.विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या सांघिक योगदानातून येथील भूमिपुत्र कॉलनीस्थीत बहुजन हिताय सोसायटीद्वारा संचालित सोलेरा येथील वसतिगृहातील मुलींच्या दोन मुलींच्या संपूर्ण वार्षिक शिक्षणाचा खर्चाचे दायित्वदेखील स्वीकारले. यावेळी विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन कोेळी, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक जयंत वडते यांच्या हस्ते मागासवर्गीय कर्मचारी संघटेनेतर्फे ५२ हजार रूपयांचा धनादेश बहुजन हिताय सोसायटीला प्रदान करण्यात आला. तसेच सोसायटीमार्फत संचालित अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षा उपयुक्त १० हजार रूपये किंमतीचे गं्रथ प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटेनेचे कार्याध्यक्ष तथा अधिसभा सदस्य अजय देशमुख, सिनेट सदस्य रवींद्र सरोदे आदी उपस्थित होते. दरम्यान कुलगुरू चांदेकर, प्र-कुलगुरू जयपूरकर, कुलसचिव देशमुख यांनी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बुंदीचे लाडू, मिठाई वाटपाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मागासवर्गीय संघटनेतर्फे अभ्यासपूरक, वैचारीक व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ग्रंथाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.कुलसचिवांच्या स्वखर्चातून दोन विद्यार्थ्यांचे शिक्षणबहुजन सोेसायटीच्या वसतिगृहात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाचे दायीत्व कुलसचिव अजय देशमुख यांनी स्वीकारले आहे. यात एक मुलगा आणि एक मुलगी असणार असे त्यांनी जाहीर केले. स्वंयस्फूर्तीने दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवित कुलसचिव अजय देशमुख यांनी सामाजिक जाणीवेचा परिचय दिला.