शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंताच्या महासमाधी परिसरात ज्येष्ठ नागरिकांची अनोखी आध्यात्मिक सांज मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

राष्ट्रसंताच्या महासमाधी परिसरातील वटवृक्षाची लाभते सोबत गुरुकुंज (मोझरी) : अमित कांडलकर राष्ट्रसंताची महासमाधी प्रत्येक भक्तासाठी ऊर्जाकेंद्र आहे. या परिसरात ...

राष्ट्रसंताच्या महासमाधी परिसरातील वटवृक्षाची लाभते सोबत

गुरुकुंज (मोझरी) : अमित कांडलकर

राष्ट्रसंताची महासमाधी प्रत्येक भक्तासाठी ऊर्जाकेंद्र आहे. या परिसरात दररोज नित्यनियमाने संघटित होऊन जीवनरहस्याचा सार संत महात्म्याच्या आध्यात्मिक लिखाणात शोधून कथनाच्या माध्यमातून आत्मबोध निर्माण करण्याचा अनोखा पायंडा येथील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सांजमैफलीत पाडला. त्यांचा हा रोजचा नित्यक्रम झाल्याचे गुरुकुंजात पाहायला मिळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी परिसरात रोजच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा गोतावळा पाहायला मिळतो. पहाटेच्या वेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने दर्शन घेताना निदर्शनास येतात, तर सायंकाळी ज्येष्ठ समवयस्क एकाच ठिकाणी विशेषतः सामाजिक अंतर राखून बैठक घेऊन बसलेले आवर्जून दिसून येतात. परिसरात येणाऱ्या भाविकांना या दृश्याचे नेहमीच कौतुक! कारण आजच्या धकाधकीच्या आधुनिक युगात अशी सांजमैफल आणि तीही घरातील ज्येष्ठश्रेष्ठ वयोवृद्ध व्यक्तीची खूप कमी पाहायला मिळते, हे विशेष. येथील अनेक ज्येष्ठ नागरिक शासकीय, प्रशासकीय सेवा करून निवृत्तीनंतर आध्यात्मिक सांगड घालून आनंदी निरोगी जीवन व्यतीत करतात. त्यांचा नियमाचा शिरस्ता ठरलेला आहे. रोज महासमाधी स्थळावर नतमस्तक होणे हा त्यातील एक भाग आहे. सहभागी सदस्यांनी ठरवून ठेवलेल्या रोजच्या वेळी हजर व्हायचे. आधी परिसरातील देश-विदेशातील चालू घडामोडींचा आढावा घ्यायचा. मग कौटुंबिक सुखदुःख जाणून घ्यायचे. आपल्या आयुष्यात रक्ताचे नातलग दूर असले तरी एकटेपणा अजिबात जाणवू न देता नियमित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची लिखाण केलेल्या ग्रामगीता ग्रंथातील अध्याय वाचन करून त्याचा अर्थ सांगितला जातो. त्याचबरोबर इतर संतांच्या ग्रंथ ओवीचे वाचन व त्याच्या अर्थ मांडण्याचा प्रयत्न या सांजमैफलीत उपस्थित प्रत्येक ज्येष्ठ नागरिक करताना दिसून येतो. यातून अनोखी ऊर्जा प्राप्त होते. अधिक सक्षमपणे जगण्याची ऊर्मी या आध्यत्मिक साहित्यामधून प्राप्त होते, असे उपस्थित ज्येष्ठ नागरिक आवर्जून सांगतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अशा प्रकारची आध्यात्मिक सांजमैफल खरोखरच अनोखी अन्‌ लक्षवेधी आहे.

--------------------------------------------

यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला असता महासमाधी परिसर ऊर्जास्थान असून, या ठिकाणी मुबलक वृक्षसंपदा आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ बसलो तरी मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो. सोबतच आध्यात्मिक शांती मिळते, असे मत हांडे गुरुजींनी व्यक्त केले.

300721\20210725_181050.jpg

batmi photo