शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांचे दत्तकग्राम आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 21:59 IST

अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये आहेत.

ठळक मुद्देडेंग्यूचे दोन पॉझिटिव्ह : आरोग्य प्रशासन झोपेत, घरोघरी रुग्ण

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये आहेत.स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे जन्मगाव तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे सांसद आदर्श दत्तकग्राम टिमटाळा साथरोगाने ग्रस्त आहे. गेल्या एक महिन्यापासून या गावाला साथरोगाने घेरले आहे. त्यात डेंग्यूने शिरकाव केला आहे. ज्ञानेश्वर भडके व रोशन बगाडे यांचे रक्ताचे नमुने सकारात्मक आले आहेत. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख इस्पितळात उपचार घेतले. डेंग्यूरुग्ण संख्येत अधिक वाढ होवू शकते, अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे. अशा गंभीर स्थितीतदेखील आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आजाराची व्याप्ती वाढवित आहे.गावात केवळ एकदा फवारणी करण्यात आली. मात्र, ठिकठिकाणी घाणच घाण साचली आहे. आरोग्य प्रशासनाने आमच्या गावाची दखल घ्यावी, असे गावकऱ्यांमध्ये कळकळीने बोलले जात आहे.वाहता नाला झाला अवरुद्धगावाला खेटून जाणारा वाहता नाला खोलीकरणामुळे अवरुद्ध झाला आहे. एकाच ठिकाणी साचून राहणाºया घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत चालली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाल्याचे घाण पाणी गावात शिरत आहे.सदस्यांच्या घरासमोरच शेणाचा ढिगाराटिमटाळ्याचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरच शेणाचा भलामोठा ढिगारा आहे. या ढिगाºयामुळे डासांचा प्रादुर्भाव सतत राहतो. संबंधित ग्रामसेवकाला हा शेणाचा ढिगारा दिसत नाही का? गावाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामसेवक व जिल्हा परिषद प्रशासन ढिगारा संगळणाºयावर कारवाईल करेल का?स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आमच्या गावात साथरोगाने थैमान घातले आहे. माझ्या मुलाला डेंग्यू झाला आहे. तो उपचार घेत आहे.- उत्तम भडके, गावकरीसाथरोगाची सुरुवात होऊन एक महिना झाला. तेव्हाच ग्रामपंचायतला स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे गावकºयांनी सांगितले होते. आता तरी ठोस उपाययोजना राबवावी.- श्रीपाल सहारे, गावकरी