शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व... दर्शक आत, बाहेर खाकीचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:58 IST

‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करून समस्या निर्माण करू नका, अशी तंबी थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. शहरातील सहा चित्रपटगृहांत नऊ स्क्रीनवरून हा चित्रपट दाखविण्यात आला.

ठळक मुद्देसीपींनी सांभाळला मोर्चा : राजपूत सेनेचे २० ताब्यात, ‘पद्मावत’ला संमिश्र प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करून समस्या निर्माण करू नका, अशी तंबी थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. शहरातील सहा चित्रपटगृहांत नऊ स्क्रीनवरून हा चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी या सातही चित्रपटगृहांच्या आत दर्शक आणि बाहेर पोलिसांचा खडा पहारा असे अभूतपूर्व चित्र पाहायला मिळाले.चित्रा चित्रपटगृह आणि राजकमल चौकात राजपूत सेनेच्या काहींनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एकंदर पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षण दिल्याने आंदोलनकर्ते निदर्शनापुरते मर्यादित झाले. आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बंदोबस्ताची कमान सांभाळल्याने पोलिसांनी चित्रपटगृहांबाहेर खडा पहारा दिला.सकाळी ११ वाजताच पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी सातही चित्रपटगृहांबाहेर मोर्चा सांभाळला. बिग राजेशसमोर अधिक मोठा खुला परिसर असल्याने तेथे आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन बॅरिकेट्स लावण्यात आले. चित्रा वगळता अन्य चित्रपटगृहांकडे आंदोलनकर्ते फारसे फिरकले नाहीत. चित्रपटावर उड्या घेणाऱ्यादर्शकांचीही कसून चौकशी करण्यात आली.सीपी इन थिएटर!चित्रपटाला संभाव्य विरोध लक्षात घेता, आयुक्त मंडलिक यांनी बुधवारीच सुरक्षेचा आढावा घेतला. गुरुवारीही ते उपायुक्त शशिकांत सातवसह सकाळी ११ च्या सुमारास चित्रा, सरोज, प्रिया, प्रभात, बिग राजेश व ई-आॅर्बिटला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या ठाणेदारांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश त्यांनी दिले. रात्रीच्या खेळावेळीही ३०० च्या वर कर्मचारी तैनात असल्याने अप्रिय घटना घडली नाही.