शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अभूतपूर्व अनागोंदीला सत्ताधीश, आयुक्त जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:55 IST

महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे जोरदार आंदोलन : राजकमल चौकात तळली भजी, नियोजनशून्येतचा आरोप

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला. विरोधीपक्षनेता बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापौरांना जाब विचारला. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. वर्षभरानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच जोरदार आंदोलन केले.काँग्रेसने सोमवारी राजकमल चौकात पकाडे तळून भाजप सरकारचा निषेध केला.तथा गत एक वर्षात शहरातील विकासकामे ठप्प होण्यास भाजपसह प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तांना जबाबदार धरले. तेथे निदर्शने केल्यानंतर काँगे्रसी कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोर आले. मात्र आ.सुनील देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीसाठी आयुक्त विश्रामगृहात गेल्याने बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी संताप व्यक्त करीत आयुक्त जाणूनबुजून गेल्याचा आरोप केला. आयुक्तांना जाब न विचारता हे आंदोलक महापौरांकडे पोहोचले. तेथे वादळी चर्चा झाली.सभागृह नेता सुनील काळे व विलास इंगोले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भाजपचा निषेध करीत अश्वासनपूर्ती करा, अन्यथा खुर्ची खाली करा, असा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या या आंदोलनाने महापालिकेत बºयाच कालावधीनंतर मोठे आंदोलन पाहावयास मिळाले. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, नगरसेवक प्रशांत डवरे, माजी महापौर वंदना कंगाले, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे, सलिम बेग आदीं नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.काँग्रेस आक्रमक, महापौर निरुत्तरवर्षभरानंतरही स्वच्छतेच्या एकल कंत्राटावर सत्ताधीश तसेच आयुक्त निर्णय घेऊ शकले नाहीत, त्यासाठी आवश्यक असलेल्या ३२ कोटींचे कुठलेही नियोजन नाही. पीएमआवास योजनेत पीआरकार्डची जाचक अट टाकल्याने आतापर्यंत एक वीटही लागू शकली नाही. रमाई आवास योजनेच्या हप्त्यासाठी लाभार्थी महापालिकेच्या चकरा मारत आहेत. मजीप्राने संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे. त्यांच्यावर महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नाही. एवढेच काय तर प्रशासनावर भाजपचा वचक राहिलेला नाही. भटकी कुत्री अमरावतीकरांच्या जीवावर उठली आहे. या मुद्यावर काँगे्रसने महापौर संजय नरवणे यांना जाब विचारला. मात्र, महापौर सकारात्मक उत्तरे देऊ शकली नाहीत.