शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात सुरी खुपसून बेरोजगाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:25 IST

हॉटेलमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने गळ्यात सुरी खुपसून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधी चौकातील स्वादिस्ट भोजनालयात घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. अभिजित शरद इंगळे (३६,रा. गोदावरी कॉलनी, वर्धा) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देशहरात खळबळ : गांधी चौकातील भोजनालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हॉटेलमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने गळ्यात सुरी खुपसून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधी चौकातील स्वादिस्ट भोजनालयात घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. अभिजित शरद इंगळे (३६,रा. गोदावरी कॉलनी, वर्धा) असे मृताचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार, अभिजित इंगळे काही दिवसांपासून शहरातील विविध हॉटेलमध्ये जाऊन कामाचा शोध घेत होता. त्याने मामाजी, मराठा सावजीसह अन्य हॉटेलमध्ये चौकशी केली. कोणीही काम देत नसल्याचे पाहून तो निराश झाला. अशा मानसिक स्थितीत फिरत असताना अभिजित दोन दिवसांपूर्वी गांधी चौकातील दत्त पॅलेसच्या व्यापारी संकुलातील स्वादिस्ट भोजनालयात जेवण करायला गेला. तेथेही नोकरीची मागणी केली. मात्र, मालक अजय शिरभाते त्यावेळी उपस्थित नसल्यामुळे, त्याला पुन्हा येण्यास सांगितले गेले. बुधवारी अभिजित पुन्हा स्वादिस्ट भोजनालयात गेला. भोजनालय बंद असल्याचे पाहून तो संकुलाबाहेरील पायाºयावर बसला. आत झोपलेल्या नोकर मंगेश हरिदास केवदे (रा.गणोजा) याने सकाळी १० वाजता भोजनालयाचे शेटर उघडले. मंगेश तोंड धुऊन चहा पिण्यासाठी बाहेर गेला. १० मिनिटांनी तो भोजनालयात परतला असता, त्याला अभिजित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मंगेशने तत्काळ घटनेची माहिती मालकाला दिली. पोलिसांची सीआर वाहन घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचारी सुधीर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ पोलीस वाहनात अभिजितला टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी अभिजितला मृत घोषित केले. माहितीवरून पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड घटनास्थळी दाखल झाले. अभिजितचा मृतदेह शव विच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवला असून, त्याच्या मृत्युबाबत नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाने गळ्यात सुरी खुपसून आत्महत्या केली. स्वादिस्ट भोजनालयासमोर ही घटना घडली. मृताच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.- दिलीप पाटील,पोलीस निरीक्षक, कोतवाली