शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना समजून घ्या, समजावून सांगा!

By admin | Updated: June 18, 2015 00:17 IST

नशिरपूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यातून बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर येथील ...

बैठक : उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा क्लासमोर्शी : नशिरपूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यातून बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मोर्शी उपविभागातील मोर्शी आणि वरुड तालुक्यातील बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ‘शेतकऱ्यांना समजून घ्या आणि समजावून सांगा’ असा सल्ला दिला. शेतकरी व बँक अधिकाऱ्यांमधील वाद वाढू नयेत, यासाठी वऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती विशद केली. या पस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागण्याचे आवाहन केले. बँकेला शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करताना कायदेशीर अडचण येत असेल तर त्यांना लेखी कळवावे, जेणे करुन संबंधित शेतकऱ्याला या निर्णयाविरूध्द वरिष्ठांकडे दाद मागता येईल, असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकेतील कृषीकर्ज अधिकाऱ्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी प्रत्येक बँकेला गावनिहाय कर्जपुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यातील किती शेतकऱ्यांना लक्ष्यप्राप्तीकरिता कर्ज देता येऊ शकेल, त्याची यादी लावण्यात यावी, कर्ज पुनर्गठनाच्या नियमाप्रमाणे यादी तयार करुन प्रक्रिया सुरु करावी, असेही उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी बैठकीत सांगितले. (तालुका प्रतिनिधी)भोगवटदार वर्ग २ चे कर्ज प्रकरण भोगवटदार वर्ग २ च्या शेतकऱ्यांना कर्जासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याची गळ बँकेकडून घातली जाते. तथापि २००४ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे अशी गरज नसल्याचे उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. सोबतच या परिपत्रकाच्या प्रती देखील बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.व्याजाची कपात करु नका : संत्रा फळपीक पुनर्जीवन व शासनाने दिलेल्या इतर मदतीच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करण्यात येत असल्याची ओरड आहे. पीककर्ज पुनर्गठन करताना बँकेच्या १२ टक्के व्याजाच्या रकमेपैकी ६ टक्के व्याज शासन बँकेला देणार असल्यामुळे अशी वसूली न करण्याचे आवाहनही करण्यात आले.राजस्व अधिकारी मदतीला ! ४शेती कर्ज देताना काही अडचणी येत असतील तर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणात बँकेला मदत करतील, असे आश्वासन देण्यात आले.