शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी नॅशनल हायवेवर अंडरपास, वन विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 20:10 IST

वनसंवर्धन अधिनियम १९८० नुसार वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग रस्ते निर्मिती करताना वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या भ्रमणमार्गावर अंडरपास निर्माण करणे बंधनकारक आहे.

- गणेश वासनिक अमरावती : वाघ व अन्य वन्यजीव  रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत असल्याने यापुढे नॅशनल हायवे निर्माण करताना वन्यजीवांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. वनक्षेत्रातून जाणा-या राष्ट्रीय महार्गावर किमान दोन किमी लांबीचे भुयारी मार्ग (अंडरपास) निर्माण करण्याची सक्ती राज्याच्या वन विभागाने केली आहे. रस्ते निर्मितीचे प्रस्ताव सादर करताना भुयारी मार्ग असल्याशिवाय परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० नुसार वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग रस्ते निर्मिती करताना वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या भ्रमणमार्गावर अंडरपास निर्माण करणे बंधनकारक आहे. वनविभागाचे उपवनसंरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तपणे घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी लागणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्ग रस्ते निर्मितीत संबंधित अधिकाºयांना वन्यजीवांचे भ्रमण मार्ग शोधावे लागतील. रस्ते निर्मितीत वन्यजीवांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी हे राज्य शासनाकडे पाठवतील. राज्याच्या वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू यांनी २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे.  असे असेल नवे भुयारी मार्गवनक्षेत्र अथवा राखीव जंगलातून राज्य व राष्ट्रीय महामार्ग निर्माण करताना वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी दोन किमी लांबीचे अंडरपास तयार करावे लागेल. या अंडरपासची खोली ३ मीटर तर, रूंदी ४ मीटर असेल. जंगलाच्या स्थितीनुसार अंडरपास निर्माण करावा लागेल. किमान दोन किमी लांबीचा भुयारी मार्ग निर्माण करावा लागणार आहे. वनक्षेत्रातील रस्ते निर्मितीच्या प्रस्तावास नकाशात अंडरपास नसल्यास परवानगी मिळणार नाही, ही बाब वनविभागाने स्पष्ट केली आहे. वन्यजीवांचे भ्रमण मार्ग बाधित होऊ नयेवन्यजीवांचे भ्रमणमार्ग बाधित होणार नाही, याची दक्षता वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला घ्यावी लागणार आहे. वनक्षेत्राची परिस्थिती लक्षात घेता भुयारी मार्ग निर्माण करावे लागतील. ते दोन किमीपेक्षा कमी असणार नाही. वनक्षेत्रातील वाघ व अन्य वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अंडरपास  असणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती