शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह वाढला

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे.

घरचाच अहेर : मर्जीनुसार कामे होत नसल्याने मतभेदअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे. त्यामुळे सत्तेच्या शेवटच्या टप्यात हा कलह वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामिण भागाच्या विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत जनतेने विकासाच्या अपेक्षा ठेवून प्रतिनिधी निवडून पाठविले आहेत. मात्र सध्या जिल्हा परिषदेत विरोधकांपेक्षा सत्ताधारी मंडळीत सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचे विकास कामांच्या मुद्यावर अंतर्गत मतभेद होत आहेत.ही परिस्थिती खरी असली तरी बाहेर मात्र सर्व काही ठिकठाक सुरू असल्याचा देखावा निर्माण करण्यातही मिनी मंत्रालयातील पदाधिकारी माहीर आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहनावर कॉग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असली तरी राज्यात सरकार मात्र भाजपा, शिवसेनेची सत्ता असल्याने विकास निधीला अपेक्षोपेक्षा कमी निधी मिळणे स्वाभावीक असले तरी जिल्हा परिषदेला उपलब्ध होणारा निधी बऱ्याच प्रमाणात मोठा आहे. या निधीतून विकास कामे करतांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना भरसाठ निधीची अपेक्षा असून तसा निधीही पदरात पाडून घेण्यासाठीही काही सदस्य आणि पदाधिकारी यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यामुळे केवळ सभा, बैठका आणि महत्वाच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही निधी वाटपात झुकते माप मिळत आहे. ही वास्तवीकता लपवून नसली तरी आता जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहासनाचा कालावधी केवळ एकच वर्ष शिल्लक असल्याने जवळ आहे. त्यामुळे आगामी निवडणूका डोळयासमोर ठेवून पुन्हा सभागृहात प्रतिनिधीत्व मिळावे आणी विकास कामांचा संदेश आपल्या क्षेत्रातील मतदारापर्यत जावा यादुष्टीने विकासात कामात मर्जीनुसार निधी व सोईनुसार कामे करावीत यासाठी सत्ताधाऱ्यांचा मुख्यपदाधिकाऱ्यावर दबाब आणण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दबावाला बळी न पडता संधी साधूना वठनिवर आण्यासाठी जोरकस मोहीम सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सताधाऱ्यामधील सहकार्यामध्येच दबक्या आवाजात अंतर्गत कलह वाढला आहे. परंतु सध्या तेरी भी चुप अन मेरी भी या प्रमाणे वेगवेगळया मार्गाने आपली कामे काढून घेण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. एखाद्या कामात अडथळा आला तर याची तक्रार थेट गॉडफादर पर्यत करण्यातही सत्तेमधील सहकारी मागेपुठे न पाहता कामे मार्गी लावत आहेत. मात्र सामान्य व्यक्ती हा पदावर असला तर तो आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ज्या हेतून सोपविली त्याची प्रामाणिकता ठेवून कामे करत असतांना अशावरच मर्जीतील व स्वताचे फायदे करून घेणारी कामे आताच करून द्या अन्यथा हेच सहकारी काम मर्जी नुसार न केल्यास खड्डेबोल सुनावत असल्याने या विषयावरून आता जिल्हा परिषदेतील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या गॉडफादर असलेल्यांनाच यात मध्यस्थी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)