शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ पॅकेज अंतर्गत चार उत्पादक कंपन्या काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:33 IST

विदर्भ पॅकेज अंतर्गत शेतक-यांना सदोष आणि निकृष्ट साहित्य पुरविणा-या चार उत्पादक कंपन्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अमरावती : विदर्भ पॅकेज अंतर्गत शेतक-यांना सदोष आणि निकृष्ट साहित्य पुरविणा-या चार उत्पादक कंपन्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. धारस्कर इंजिनीअरिंग वर्क्स (मूर्तिजापूर, जि. अकोला), मे. जगदंब अ‍ॅग्रो इंजिनीअरिंग (औरंगाबाद मार्ग, जालना), मे. विजय विलियन्स कंपनी सदर्न इंजिन प्रा.लि. (२४, ए, ३ फेज इंड्रस्टिअल इस्टेट गोवंडी, चेन्नै), मे. सदन अ‍ॅग्रो द्वारा अंबिका इंजिनीअर्स (शॉप नं. १, प्लॉट नं. ३१२, निर्मल ज्योती बिल्डिंग, जवाहर रोड नं. १२, गोरेगाव पूर्व, मुंबई) या चार उत्पादक कंपन्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा, अमरावती, बुलडाणा, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या सहा जिल्ह्यांकरिता महसूल व वनविभागाने १९ डिसेंबर २००५ रोजी एक विशेष पॅकेज जाहीर केले होते. ‘उत्पादनवाढीसाठी शेतक-यांना आर्थिक मदत’ या घटक योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाने केली. यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ६० हजार शेतक-यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत सलग तीन वर्षे देण्यासाठी १५० कोटींचा निधी १३ फेब्रुवारी २००६ रोजी वितरित करण्यात आला. या योजनेत १४९.९८ कोटींपैकी १४८.१६ कोटींचे अनुदान खर्च करण्यात आले.  मात्र, शेतक-यांना वाटप झालेले साहित्य, शेतीउपयोगी अवजारे आदी अतिशय निकृष्ट दर्जाचे देण्यात आल्याच्या तक्रारींचा ओघ शासनाकडे वाढला. अखेर शासनाने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ डिसेंबर २००७ रोजी महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेत त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली. काही साहित्य अतिशय निकृष्ट, सदोष असल्याचे या समितीला आढळून आले. त्यामुळे हे साहित्य बदलून देणे अथवा दुरुस्ती करून देण्यासंदर्भात समितीने १ सप्टेंबर २००८ रोजी  शासनाकडे अहवाल सादर केला. त्यानुसार कृषी विभागाने संबंधित पुरवठादारांकडे पाठपुरावा केला. मात्र, पुरवठादारांना वेळोवेळी सूचना, स्मरणपत्र देऊनही काहीच परिणाम झाला नाही. अखेर विधिमंडळ आश्वासन समितीने निकृष्ट साहित्य पुरवठा करणाºया चार उत्पादक कंपन्यांना  दोन वर्षानंतर काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही कारवाई शासनाने केली आहे. 

शेतक-यांना या घटकाचा मिळाला लाभजमीन सुधारणा, निविष्ठा वाटप, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, रेडे जोडी, इनवेल बोरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाइप लाइन, पंप संच, पुष्पात्पादन, परसबाग, जैविक खते, नाडेफ, गांडुळखत शेड उभारणी अशा विविध घटकांचा शेतक-यांना लाभ मिळाला आहे. मात्र, यातील बहुतांश साहित्य निकृष्ट दर्जाचे ठरलेत.