आजपासून पाणीपुरवठा : लाभक्षेत्रातील पिकांसाठी वरदानअमरावती : सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. खरीप हातचा गेल्याने रबी हंगामात तरी शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, या उद्देशाने या विभागाने यंदा १०५७७ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील राज्यस्तरीय पाटबंधारे प्रकल्पांमध्ये २७ आॅक्टोबर २०१५ रोजी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार १०५७७ हेक्टर जमिनीवर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्यानंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अमरावती पाटबंधारे विभाग अमरावतीअंतर्गत मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प बंधारे, उपसा सिंचन इत्यादी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या समादेश क्षेत्रात असलेल्या लाभधारकांस कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामाकरिता १५ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधसाठी सोमवार १६ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठ्याला आरंभ करण्यात आला आहे. सिंचनाचा लाभ घेण्याच्यादृष्टीने पाणी मागणी अर्ज मागविण्यात आले होते. उर्ध्व वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठीजिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प, बंधारे, उपसासिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील पिकांसाठी आज सोमवारपासून कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना अप्पर वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठी मिळणार आहे. धरणाची पातळी कमी झाल्याने धरणातील बुडीत क्षेत्र रबी व उन्हाळी पिकांसाठी पेरणीखाली येवू शकत असल्याने अमरावती जिल्ह्यातील धरणे क्षेत्रातील सुमारे ११०४ हेक्टर जमीन यावर्षी पेरणीसाठी भाडेपट्टीवर उपलब्ध होणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूमिहिन आणि मागासवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
रबी हंगामात १०,५७७ हेक्टर जमीन सिंचनाखाली
By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST