शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बेनोडावासीयांचा निवडणुकीवर अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:29 IST

सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.

ठळक मुद्देकोरडा दुष्काळ : पाणीटंचाईचा मुद्दा प्रभावी

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.एरवी निवडणुका म्हटल्यावर ग्रामीण भागात पारावरच्या गप्पांना उधाण येते. सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे आणि चुका यावर मोठा वादविवाद रंगतो. आपापल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवाराचे उजवेपण कार्यकर्ते पोटतिडकीने सांगतात. मतदारांमध्येही निवडणूक आणि अंतिम निकालाबाबत प्रचंड कुतूहल असते.सर्वदूर आपल्याच उमेदवाराची हवा असल्याचे तुणतुणे कार्यकर्ते जोरात वाजवितात, तर मतदारही कुणाची कुठे हवा आहे, याचा मागोवा आपापल्या परीने घेतो. मात्र, यंदाची लोकसभा निवडणूक या घडामोडींना अपवाद ठरत आहे. निवडणुकीवर कोरडा दुष्काळ वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.पाणीटंचाई केंद्रस्थानीमोर्शी विधानसभा मतदारसंघ अमरावती ऐवजी वर्धेत समाविष्ट असल्याने लोकसभेत आपले स्थान दुय्यम असल्याची नागरिकांची मानसिकता आहे. निवडणुकीला दहा दिवस उरले असताना रिंगणातील उमेदवारांची नावेही ग्रामीण भागात चर्चेला नाहीत.अद्यापही कुठल्याही उमेदवाराने आपले फ्लेक्स लावलेले नाहीत. यामुळे उमेदवार कोण, हेच जनसामान्यांना माहिती नाही. गावात पिण्यासाठी आणि शिवारात सिंचनासाठी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्याने पाणी हा एकमेव विषय ग्रामिणांच्या चिंतेचा आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर एरवी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा असते, स्वत: तेच पाण्यासाठी वणवण फिरत असल्याने प्रचार कोण करेल, ही सर्वपक्षीय नेत्यांना लागलेली चिंता आहे.