शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनांची बेशिस्त पार्किंग

By admin | Updated: May 15, 2017 00:09 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहे. ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो.

नियमबाह्य : नो- पार्किंगमध्येही लावली जातात वाहनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहे. ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो. त्याच ठिकाणी नियम पाळले जात नसतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा, हा प्रश्न पुढे येत आहे. ज्या ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावले आहे त्याच ठिकाणी नागरिक व कार्यालयातील कर्मचारी राजरोसपणे वाहन पार्किंग करीत आहे. एवढ्यावरच ते थांबले नसून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रवेशव्दारापर्यंत वाहने लावण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एक शिस्त असायला हवी. येथे प्रवेशव्दाराजवळून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला नो- पार्किंगचे दोन फलक लावण्यात आले आहे. पण याच ठिकाणी फलकावरची सूचनेचे पालन होत नाही. त्यामुळे खुद जिल्हाधिकाऱ्यांनी या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी होत आहे. खनिकर्म विभागापर्यंत पार्किंग जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी परिसरात तर बेशिस्त वाहने लावले जात आहेत. पण ते एवढ्यावरच थांबले नसून रोेजगार हमी योजना विभाग व खनिकर्म विभागाच्या प्रवेशव्दाराच्या परिसरात बेवारसपणे वाहने पार्किंग करून जणू काही शिस्तभंगच करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी येथे बेशिस्त वाहने लावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवार्इंचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा आहे. बेशिस्तपणे आॅटोचीही एंट्रीजिल्हाधिकारी कार्यालयात बाहेरील आॅटोसुद्धा पार्किंग करीत आहे. हा प्रकार नियमबाह्य असून परिसरात आॅटोचालक वाहने आणतात कशी हा प्रश्नही चर्चेला जात आहे. या ठिकाणी काही शासकीय वाहनेसुद्धा नियमात पार्किंग करीत नाहीत. त्यामुळे येथे शिस्त केव्हा लावण्यात येणार, हा प्रश्न विचारला जात आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी बेशिस्तपणे वाहने लावली जात असतील तर संबंधितांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. त्यासंदर्भाची आपण माहिती घेणार असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देऊ.- अभिजित बांगर,जिल्हाधिकारी, अमरावती