शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नगराध्यक्षांवरील अविश्वास बारगळला

By admin | Updated: August 8, 2015 00:16 IST

पालिकेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांचेवरील अविश्वास प्रस्ताव आज सभागृहात एकही नगरसेवक उपस्थित न राहिल्याने बारगळला.

सभागृह रिकामे : नगरसेवक तीर्थस्थळे आणि पर्यटनात व्यस्तनरेंद्र जावरे  अचलपूरपालिकेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांचेवरील अविश्वास प्रस्ताव आज सभागृहात एकही नगरसेवक उपस्थित न राहिल्याने बारगळला. त्यामुळे नंदवंशीच नगराध्यक्षपदी कायम राहिले. या निर्णयानंतर त्यांच्या गटातर्फे ढोल-ताशे वाजवित फटाके व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.२नगराध्यक्षांविरूध्द ३० जुलै रोजी पालिकेतील एकूण ३८ नगरसेवकांपैकी तब्बल ३४ नगरसेवकांनी स्वाक्षरीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी ७ आॅगस्ट रोजी नगराध्यक्षांविरूध्द अविश्वासासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृह रिकामेच राहिलेअचलपूर : अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलाविण्यात आली होती. सहायक म्हणून मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, मुस्ताक अली, राजाभाऊ देशमुखसह अधिकारी उपस्थित होते.नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांचेवरील अविश्वास ठरावासाठी आज शुक्रवारी बोलाविण्यात आलेली विशेष सभा सकाळी ११ वाजता सभेचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांनी सबेचे कामकाज सुरु केले. परंतु ११.३० वाजेपर्यंत एकही नगरसेवक नगरपालिकेकडे फिरकले नाही. नगराध्यक्ष समर्थक व महिला नगरसेविकांचे परिजन, पत्रकार व कर्मचाऱ्यांची न.प. परिसरात उपस्थिती होती. सभागृहात चार अधिकाऱ्यांशिवाय कुणीही नव्हते. अविश्वास ठरावासंदर्भात नगरसेवकांना नोटीस चार दिवसापूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरीसुध्दा आजच्या सभेला नगरसेवक अनुपस्थित राहिले. परिणामी उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांनी सभा कोरम (गणपूर्ती) अभावी तहकूब केली. व कुठल्याच निर्णयाप्रती ठराव न झाल्याने नगराध्यक्ष पदी रंगलाल नंदवंशी हेच कायम असल्याचा शिक्कामोर्तब केला.आणि पोळा फुटलानगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी विरुध्द ३४ नगरसेवकांचा पोळा काही तासातच फुटला. तीर्थयात्रा व पर्यटनावर गेलेल्या नगरसेवकांना गावात असलेल्या नगरसेवकांना दक्षिणा मिळाल्याची माहिती होताच त्यांनी नगराध्यक्षांना ‘अपना क्या’ म्हणीत संभाषण केले. आणि जुनी येणी वसूल केली. एक-एक करता जवळपास मोठ्या प्रमाणात नगरसेवकांचा ३० जुलैचा अविश्वास ७ आगस्ट पूर्वीच व विश्वासात बदलला. नंदवंशीनी अशी कोणती जादू केली. या विचारात जूळ्या शहरातील दीड लक्ष नागरिक आहेत. मात्र नगरसेवकांची खेळीव नगराध्यक्षांची जादू सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करणारी ठरली आहे.जुळ्या शहरातील या राजकीय तमाश्याने नागरीकांचे चांगलेच मनोरंजन झाले. तर अविश्वास दाखल होण्यापूर्वीच राजकारणातील सुजान समजनारे सामान्य नागरिक ‘सब पैसो का खेल है ’ महिणत शंभर टक्के बारगळला असल्याचे बोलत होते आणि आज शुक्रवारी झाले सुध्दा तसेच.नगराध्यक्ष ओंकारेश्वरलाआज शुक्रवारी नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांचेवर अविश्वासासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र ज्यांच्याविरुध्द सभा तेच १३ नगरसेवकांसह ओंकारेश्वरला भोलेनाथाच्या दर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात आले. यात मात्र नगरसेवकांनी नगराध्यक्षांची खुर्ची हलवून पैसे पाडून घेतल्याने अविश्वास विश्वासात बदल्याचे चित्र दिसून आले. ‘लोकमत’ने चार दिवसापुर्वीच हि खेळी ेनहमीची असल्याचे स्पष्ट केले होते. ते आज खरे ठरले. काही नगरसेवक गोवा, पूणे येथे गेल्याची माहिती सूत्राने दिली. यावेळी ठाणेदार गिरीश बोबडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.अश्या घडल्या घडामोडीनगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांना आपल्यावर अविश्वासाचे सावट कुठल्या कारणामुळे आले याची इत्यभूत माहिती होती. कोण नाराज आहे आणि कश्याने दुखावले आहे. त्यांना कशा पध्दतीने जवळ करता येईल याचे आर्थिक नियोजन करण्यात आले. ३८ नगरसेवकांच्या सभागृहात नऊ नगरसेवकही साथ मिळविण्यासाठी धडपड करण्यात आली. नगराध्यक्ष नंदवंशी सह चार नगरसेवक त्यांच्या बाजूने होते. त्यामुळे सर्वप्रथम पाच नगरसेवकांची साथ मिळविण्यात आली. प्रत्येकी दोन ते तीन लक्ष रुपयाची देणगी देऊन त्यांना प्रसन्न करण्यात आल्याची चर्चा आहे. आता एक वर्ष पुन्हा आरामनगराध्यक्ष रंगलाल नंदवंी नगराध्यक्षपदी विराजमान होण्याला २२ जूलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. नगरपालिका अधिनियमानुसार विराजमान झाल्यावर एक वर्षानंतरच अविश्वास ठराव आणता येतो. तो नुकताच आणण्यात आला. व बारगळला आता पून्हा अविश्वास आणावयाचा झाल्यास या नगरसेवकांना एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत नंदवंशी यांच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीला अविश्वासाची भीती नाही. सर्व नगरसेवक विकास कामासाठी सोबत आहे. काही गैरसमज झाल्याने त्यांनी अविश्वासाची प्रक्रिया केली. मात्र सर्वांसोबत काम करावयाचे असल्याने हा अविश्वास ठराव बारगळला. शहर विकासासाठी आपण पुन्हा जोमाने कार्य करणार.- रंगलाल नंदवंशी,नगराध्यक्ष, अचलपूर, न.प.