शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी साक्षगंध, कांचन रिसॉर्टवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

अमरावती : शहरातील नवसारी रिंगरोडवरील कांचन रिसॉर्ट येथे विनापरवानगी साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे तहसीलदार पथकाच्या निदर्शनास आल्यावरून गाडगेनगर ...

अमरावती : शहरातील नवसारी रिंगरोडवरील कांचन रिसॉर्ट येथे विनापरवानगी साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे तहसीलदार पथकाच्या निदर्शनास आल्यावरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोविड- १९ साथीमुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, सार्वजनिक समारंभावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाईची तरतूदही आदेशात करण्यात आली आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा भंग होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

शहरातील कांचन रिसॉर्ट येथे बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास विनापरवानगी व सुमारे ५० व्यक्तींच्या उपस्थितीत साक्षगंध समारंभ होत असल्याचे तहसीलदार पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार रिसॉर्टचे मालक व वर-वधू यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार संतोष काकडे यांच्या निर्देशानुसार नवसारी मंडळ अधिकारी बी. जी. गावनेर व तलाठी जितेंद्र लांडगे यांनी तक्रार दिली. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७०, २७१, २९१, साथ रोग अधिनियमाचे कलम २, ३ व ४, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम ५१ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला.

बॉक्स

होम आयसोलेशन रुग्णाविरुद्ध कारवाई

अंजनगाव सुर्जी नगरपरिषद क्षेत्रात होम आयसोलेशनमदील एक रुग्ण गृह विलगीकरणाच्या काळात रस्त्यावर फिरताना आढळल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या पथकाने या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. त्यांच्या तक्रारीनुसार अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.