बदल : विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली एका क्लिकवर, कोड नंबरचा होणार वापर अमरावती : आधार कार्ड क्रमाांकप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यर्थ्यांची व शाळांची शैक्षणिक माहिती उपलब्ध झाली आहे. याच क्रमांकावरून राज्यातील कोणत्याही शाळेची व विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली पाहता येऊ शकते. विद्यार्थ्याने शाळा बदलली तरीही त्याची शैक्षणिक माहिती केवळ कोड नंबरवरून ट्रॉन्सफर होऊ शकते. तसेच प्रत्येक शाळेला 'यू' डायल कोड नंबर दिलेला आहे. यावरून राज्यातील कोणत्याही शाळेची माहिती इंटरनेटवर पाहता येते. बनावट पटसंख्येला चाप बसण्यासाठी शिक्षणक्षेत्रात चर्चेत असलेल्या 'यू' डायल हे डिजिटल सिस्टिम यावर्षापासून सुरू झाले आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला व तेथील विद्यार्थ्यांना विशिष्ट कोड नंबर दिलेले आहेत. या नंबरवरून त्यांची माहिती मंत्रालयातील सचिव एका क्लिकवर पाहू शकतात. स्टूडंट आयडेंटीफिकेशन नंबर व युनिफाईड डिस्ट्रिकट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन यु डायल, अशी त्यांची नावे आहेत. शाळांना अंकरा अंकी कोड नंबर दिलेला आहे. यातील पहिले दोन आकडे म्हणजे जिल्ह्याच्या कोड नंबर आहे. त्यानंतरचे दोन आकडे तालुक्याचा कोड नंबर राहतील. त्यानंतरचे आकडे हे शाळेचे कोड नंबर आहेत. त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांचा क्रमांक आहे. एखादा विद्यार्थी कोणत्या शाळेत कोणत्या वर्गात शिकत आहे. यापूर्वी तो कोणत्या शाळेत होता. तेथे त्याची प्रगती काय होती याची माहिती याकोडवरून मिळू शकते. प्रत्येक शाळेला यू डायल या पद्धतीने कोड दिलेले आहेत. त्या कोडवर त्याच्या शाळेतील पटसंख्येसह इतर माहीती उपलब्ध होते. प्रत्येक शाळेने ही माहिती संगणकावरुन अपलोड केली आहे. गेले वर्षभर हे काम सुरू होते. या वर्षापासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)यू डायल पध्दतीयू डायल पध्दतीमुळे प्रत्येक शाळेला एक क्रमांक मिळालेला आहे. त्या क्रमांकावर त्यांनी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेची संख्या आणि आरटीएच्या नियमानुसार आवश्यक ती माहिती देणे बंधनकारक होते या पध्दतीत समाविष्ट माहीतीच खरी मानली जाणार आहे. ही माहिती राज्यस्तरीय डेटामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
शाळांसाठी ‘यू-डायल’, बनावट पटसंख्येला चाप
By admin | Updated: July 5, 2016 00:32 IST