शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

दोन वर्षीय चिमुकला उद्ध्वस्त आईच्या कुशीत शोधत होता आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:07 IST

होत्याचे नव्हते होणे हे किती क्लेशदायक असते, याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी बहिरम मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आला. एकीकडे अपघातात रस्त्यावर पडलेला पतीचा आणि पोटचा गोळा असलेल्या चार वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाकडे टक लावलेली उद्ध्वस्त आई आणि दुसरीकडे दुचाकीवरून फेकला गेल्याने भेदरून तिच्या कुशीत आश्रय शोधणारा दोन वर्षीय रक्तबंबाळ चिमुकला हे केविलवाणे दृश्य उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले.

ठळक मुद्देवडील-मुलीचा करुण अंत, तर मुलगा-आई गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : होत्याचे नव्हते होणे हे किती क्लेशदायक असते, याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी बहिरम मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आला. एकीकडे अपघातात रस्त्यावर पडलेला पतीचा आणि पोटचा गोळा असलेल्या चार वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाकडे टक लावलेली उद्ध्वस्त आई आणि दुसरीकडे दुचाकीवरून फेकला गेल्याने भेदरून तिच्या कुशीत आश्रय शोधणारा दोन वर्षीय रक्तबंबाळ चिमुकला हे केविलवाणे दृश्य उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले.मध्य प्रदेशच्या उदामा येथून परतवाडा येथे काही खरेदीसाठी आलेल्या बेलसरे कुटुंबाचा परतीच्या प्रवासात काळाने घात केला. दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात मुलगी स्वाती आणि वडील सुभाष यांचा करुण अंत झाला, तर चिमुकला अजय आणि आई सुमन गंभीर जखमी झाली. त्याच्या काही क्षणापूर्वीच हसत-बागडत हे कुुटुंब दुचाकीने आपल्या गावाकडे मार्गक्रमण करीत होते. प्रवासातील गमती-जमतींचे एकमेकांशी आदानप्रदान सुरू होते. भावी आयुष्याचे स्वप्नही त्यात होते. यावेळी मात्र पुढे सर्वनाश वाढून ठेवला आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. यमदूत म्हणून विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी घेऊन आलेल्या दारूड्याने जोरदार धडक दिलीअपघात एवढा भीषण होता की, आवाजाने आंतरराज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नजीकच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच सर्व काही संपलं होतं.अजयने उपस्थितांना रडविलेमाय-लेकांना रुग्णालयात नेण्यासाठी उपस्थितांनी अजय जवळ घेण्याचा सर्वप्रकारे प्रयत्न केला. परंतु भेदरलेला अजय आईच्या कुशीत रक्तबंबाळ अवस्थेत आश्रय शोधत होता, तर याच अपघातात गंभीर जखमी सुमन बेलसरे नि:शब्द झाल्या होत्या. गंभीर अजयची आर्त हाकसुद्धा ऐकू न येण्याइतपत सुमनला भान नव्हते. अजयचे आईला बिलगणे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.