शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत दोन महिलांना लुटले; अज्ञात मोटारसायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: April 16, 2023 14:34 IST

एक महिला तिच्याकडील जुने वापरते सोने गहान ठेवण्यासाठी मोतीनगर परिसरात गेली होती.

अमरावती: घराकडे पायदळ जात असलेल्या एका महिलेला दुचाकीवर बसवून तिच्याकडील ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटण्यात आला. १५ एप्रिल रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास कलोतीनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात मोटारसायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल केला.

एक महिला तिच्याकडील जुने वापरते सोने गहान ठेवण्यासाठी मोतीनगर परिसरात गेली होती. मात्र ते दुकान बंद असल्याने त्या महिलेने स्वत:कडील ७ ग्रॅमची व गळयातील १० ग्रॅमची सोन्याची पोत मोबाईलसह पिशवीत ठेवली. ती घराकडे पायदळ जात असताना मागून एक दुचाकीस्वार तिच्याजवळ येऊन थांबला. आपण पापडाचा व्यवसाय करत असून, तुम्ही पापड लाटण्याचे काम कराल का, त्यामोबदल्यात आठ हजार रुपये देईन, अशी बतावणी त्याने केली.

तुम्ही माझ्या सोबत माझ्याघरी चला, पगाराबाबत माझ्या आईशी सविस्तर बोलून घ्या, असेही तो म्हणाला. त्यामुळे पैशाच्या आशेपोटी ती महिला त्या अज्ञाताच्या दुचाकीवर बसली. तो तिला कलोतीनगर परिसरात घेऊन गेला. निर्जन स्थळ पाहून त्याने महिलेकडील सोन्याच्या लहान मोठ्या पोत व मोबाईल असलेली पिशवी हिसकावली. काही क्षणातच तो दुचाकीने रफुचक्कर झाला. तिने आरडाओरड केली. मात्र, भर दुपारची वेळ असल्याने कुणापर्यंत तिचा आवाज पोहोचू शकला नाही. परिणामी, कुणी तिच्या मदतीला धावू शकले नाही. त्यामुळे तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.दुचाकीस्वार आले न हिसकावली पर्स 

शिवाजी कॉलेजच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या एका महिलेकडील पर्स जबरदस्तीने हिसकावण्यात आली. १५ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सुपर स्पेशालिटी दवाखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. शैक्षणिक कामासाठी शहरात आलेली ती महिला शनिवारी दुपारी सांस्कृतिक भवनासमोरच्या रस्त्यावर ऑटोची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात तिला लघुशंका आल्याने ती आडोसा शोधण्यासाठी मोर्शी रोडवरील सुपर स्पेशालिटीकडे जाणाऱ्या मार्गाकडे गेली. तेवढ्यात एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिच्याकडील पर्स हिसकावून पळ काढला. त्या पर्समध्ये ८०० रुपयांचा मोबाईल व ७ हजार रुपये रोकड असल्याची तक्रार महिलेने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली.

टॅग्स :RobberyचोरीAmravatiअमरावती