शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरातून अमरावती गाठत दुचाकी चोरी; चार अट्टल चोर जेरबंद

By प्रदीप भाकरे | Updated: July 30, 2024 23:44 IST

१५ दुचाकी जप्त, गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई.

अमरावती : अमरावती शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या नागपुरच्या चार सराईत चोरांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. प्रणव संजय ठाकरे (२३), करण गणेश उके (१८, दोघेही रा. खामला, नागपूर), प्रणव सुरेश मारबते (२०, रा. हनुमाननगर, वानाडोंगरी, नागपूर) व ऋषिकेश रवी कुंबरे (१९, रा. जयताळा, नागपूर) अशी अटक चोरांची नावे आहेत.

शहरातील मंगलधाम परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथील रहिवासी सुमेध साळुंखे यांची दुचाकी घरासमोरील पार्किंगमधून लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी सुमेध साळुंखे यांनी ३० जून रोजी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट दोनही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात या गुन्ह्यात प्रणव ठाकरे याचा हात असल्याचे समोर आल्यावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच साथीदार करण उके, प्रणव मारबते व ऋषिकेश कुंबरे यांच्यासोबत अमरावती व नागपूर येथून अन्य दुचाकी चोरल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार करण, प्रणव व ऋषिकेशलाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. 

यांनी केली कारवाईही कारवाई सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व सत्यवान भुयारकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, राजेंद्र काळे, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, चंद्रशेखर रामटेके, नीलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, अमर कराळे व संदीप खंडारे यांनी केली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती