सोनू सेवादास तंबोले (३४, रा. बेलपुरा) हा गेट लाईफमध्ये वॉर्डबॉय असून याने एमएच २७ सीके ८५४६ क्रमांकाची दुचाकी हॉस्पिटलच्या गेटजवळ उभी केली होती. मात्र, ती अज्ञाताने लंपास केली. तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------------
फवारणीच्या विषारी औधषीने तीन शेळी दगावल्या
अमरावती : फवारणीच्या विषारी औधषीमुळे तीन शेळ्या दगावल्याची घटना शुक्रवारी वलगाव हद्दीत उघडकीस आली. वलगाव पोलिसांनी शेख जब्बार शेख सत्तार (४०, रा. खारतळेगाव) यांच्या तक्रारीवरून आरोपी नरेंद्र बळवंतराव गुळधे (५० रा. खारतळेगाव) विरुध्द गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी केला.
---------------------------------------------------
व्हीएमव्हीतील संगणकशास्त्र विभागात चोरी
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील (व्हीएमव्ही) संगणक विभागात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. चोरांनी संगणकशास्त्र विभागातून १० हजार ८०० रुपयांचे साहित्य लंपास केले. प्रशांत महादेव सिनलकर (४८ रा. पंचवटी चौक, गाडगेनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.