शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा चौकात दुचाकीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:13 IST

............... माहुली जहागीर येथून कृषी साहित्य लंपास अमरावती : माहुली जहागीर येथील बाजार चौकातील उत्तमराव डोंगरे यांच्या घरातून भांड्याचे ...

...............

माहुली जहागीर येथून कृषी साहित्य लंपास

अमरावती : माहुली जहागीर येथील बाजार चौकातील उत्तमराव डोंगरे यांच्या घरातून भांड्याचे तीन पोते, दोन सायकली, बैलबंडीची लोखंडी चाके व इतर असे ११ हजारांवर साहित्य लंपास करण्यात आले. डोंगरे कुटुंब बाहेरगावी असताना ४ जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. त्यांनी ३१ ऑगस्ट रोजी माहुली जहागीर पोलिसात तक्रार नोंदविली.

------------------

पतीची पत्नी, सासऱ्याला मारहाण, शिवीगाळ

अमरावती : कपडे घेऊन जाण्यासाठी सासरी परतलेल्या महिलेला पतीने मारहाण केली. त्यापाठोपाठ दाखल झालेल्या सासऱ्यालाही शिवीगाळ केली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसात चेतन जयवंतराव देशमुख, जयवंतराव देशमुख (दोन्ही रा. मंगलधाम कॉलनी) व एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------

अंजनगाव बारी शिवारातून साहित्य लंपास

बडनेरा : अंजनगाव बारी शिवारातील शैलेश घनश्याम होलानी (५०, रा. राहणार जयस्तंभ चौक) यांच्या शेतातील जुने एक हजारांचे किरकोळ साहित्य लंपास केल्याची माहिती सुनील दातीर यांनी त्यांना दिली. यावरून त्यांनी राहुल दादाराव वरठे (४८), राजू भगवान मेहेंगे व राजू शंकरराव गरुड (४०, सर्व रा. अंजनगाव बारी) यांच्याविरुद्ध बडनेरा पोलिसात तक्रार नोंदविली.

---------------

गाडगेनगरात मेडिकल स्टोअर फोडले

अमरावती : राधानगरी येथे निशांत दिलीप कविटकर (२३, रा. अडगाव) यांच्या मालकीचे राधानगरातील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्याने ३१ ऑगस्टच्या रात्री फोडले. येथून ७८५० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. निशांतने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

--------------

श्रीकृष्णनगर येथून रोकड लंपास

अमरावती : पाठ्यपुस्तक महामंडळापुढील श्रीकृष्णनगरातील गजानन गावंडे (५०) यांच्या घराचे कुलूप तोडून पाच हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. १८ ऑगस्ट रोजी ते महागाव तालुका दिग्रस येथे आईचा मृत्यू झाल्याने गेल्यानंतर ही घटना घडली. १ सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.

----------

बडनेरातील इसमाचा नागपुरात मृत्यू

बडनेरा : नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बडनेरा येथील राजेंद्र यशवंत सोमकुंवर (४८) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. बडनेरा पोलिसांनी दाखल केला आहे.