शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मोतीनाला पुलाखाली दुचाकी कोसळून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:17 IST

दुचाकीने जात असताना सेमाडोहनजीकच्या मोती नाल्यात दुचाकी कोसळून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात घडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली. शोककळा उमटली.

ठळक मुद्देदोघेही शिक्षक : चिखलदरा तालुक्यातील सेमाडोहनजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दुचाकीने जात असताना सेमाडोहनजीकच्या मोती नाल्यात दुचाकी कोसळून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात घडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली. शोककळा उमटली.मधुकर शिवाजी राठोड (३६, रा. पिट्टीगुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर) असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. अनिल मावस्कर (रा. शिरपूर, ता. धारणी) असे दुसºया मृताचे नाव आहे. दोघेही दुचाकी क्रमांक एमएच १७ एक्यू ४७८ ने धारणीकडे जात असताना दुचाकी मोतीनाला पुलावरून २५ फूट खोल कोसळल्याने मधुकर राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी अनिल मावस्कर यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सभागृहात ठेवल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस पंचनामा सुरू होता.चिखलदरा तालुक्यात पूर्वी होते कार्यरतमृत मधुकर शिवाजी राठोड हे चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम सरोवरखेडा व नोबिता येथे सन २००३ ते २०१६ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत गुंजी येथील जिल्हा परिषद शाळेत झाली. शनिवारी अनिल मावस्कर यांच्या गावी जात असताना हा अपघात झाल्याची अनिल मावस्कर यांच्या पत्नी शोभा मावसकर यांनी सांगितले. त्या बोपापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत.