शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार लीटर दूध जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:02 IST

बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आला. माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन विभागाने तत्क्षण धाड टाकून दोन हजार लीटर दूध जप्त केले.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : तपासणीसाठी पाठविले नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आला. माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन विभागाने तत्क्षण धाड टाकून दोन हजार लीटर दूध जप्त केले. ही कार्यवाही गुरुवारी सातुर्णास्थित शिव उद्योग फॅक्टरीत करण्यात आली.सदर दुधाचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती एफडीए अधिकाºयांनी दिली.कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा अधिक वापर होत असल्याने मागणी लक्षात घेता अतिरिक्त नफा कमविण्याच्या उद्देशाने विविध दूध डेअरींच्या संचालकांनी विविध पद्धतीने दुधाची साठवण करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे सातुर्णास्थित एमआयडीसीतील शिव गृहउद्योग येथे तीन दिवसांपासून दूध साठवून ठेवल्याच्या माहितीवरून एफडीएने धाडी टाकून दोन हजार लीटर दूध जप्त केले आहे. अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार दुधाचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.कोजागिरीसाठी शहरात खासगी दूध डेअरींमध्ये मोठ्याप्रमाणात दुधाची साठवण करण्यात आली आहे. भेसळयुक्त व कृत्रिमरीत्या तयार केलेल्या दुधावर एफडीएची नजर असल्याचे वृत्त 'लोकमत'ने गुरूवारच्या अंकात प्रकाशित केले होते.नियमाचे उल्लंघनयावर एफडीचे सह.आयुक्त सुरेश अन्नपुरे व सहायक आयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे व राजेश यादव व इतर पथकाने सातुर्णा परिसरातील शिव गृहउद्योग येथे धाड टाकूृन अखाद्य बर्फ तयार करण्याच्या ठिकाणी दुधाची साठवण करून ठेवली होती. हा प्रकार नियमाचे उल्लंघन करणारा असून यासंदर्भात तपासणी करण्यात आली.दोन हजार लीटर दूधसाठा याची किंमत अंदाजे १ लाख २० हजार रूपये असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. शिव गृहउद्योगचे संचालक गजेंद्र केडीया असून जप्त केलेला दूधसठा देवकी दूध डेअरी, श्रीकृष्ण दूध डेअरी, गांधी चौक, रघुवीर दूध डेअरी गांधी चौक, रूख्मिणी दूध डेअरी चपराशीपुरा, गोपालाकृष्ण दूध डेअरी अंबापेठ, राज दूध डेअरी गांधी चौक आदी डेअरींचे सदर दूध असल्याची माहिती केडिया यांनी एफडीए अधिकाºयांना दिल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे दुधाची अवैध विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे.