शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परिसरात बिबट जोडप्यासह दोन पिलांचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:32 IST

गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस्त्यांमधील कुत्र्यांची संख्या कमी केल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये दहशत : सतर्कतेबाबत लागले फलक, वनविभागाला पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याची दहशत कायम आहे. येथे एकच बिबट्या नसून, जोडप्यासह दोन पिलं असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिबट्यापासून सतर्कतेसाठी जागोजागी सूचनांचे फलक लावण्यात आले आहे, तर बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या भागात सायंकाळी ७ वाजेनंतर प्रवेश मनाई करण्यात आली आहे.गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस्त्यांमधील कुत्र्यांची संख्या कमी केल्याचे वास्तव आहे. गत आठवड्यात विद्यापीठाच्या कँटीनपर्यंत कुत्र्यांच्या शिकारीसाठी त्याने येण्याची मजल गाठली आहे. तलाव परिसर, शारीरिक शिक्षण विभाग, जलतरण, क्रिकेट मैदान, रसायनशास्त्र विभाग आदी विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्यांपासून सतर्कता ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात सायंकाळी पायी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. काही मुख्य भागात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.कुलगुरू बंगला परिसरात नियमितपणे बिबट्याचे संचारक्षेत्र असल्याने या भागात अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे. हल्ली विद्यापीठात केवळ बिबट्याबाबत जोरदार चर्चा झडत आहेत. कँटीनपर्यंत त्याने मजल गाठल्यामुळे विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.पोलीस उपायुक्तांकडून बिबट्याच्या संचारक्षेत्राची पाहणीविद्यापीठात बिबट्याचे वास्तव असल्याबाबत पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सोमवारी विद्यापीठ परिसर पिंजून काढला. बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या भागात सुरक्षा रक्षकांकडून बिबट्याच्या मार्गाचे अवलोकन केले. तलाव परिसराची पाहणी करताना नजीकच्या वनक्षेत्रातून बिबट्याचा मार्ग जाणून घेतला.विद्यापीठात एकच बिबट नव्हे, तर जोडप्यासह दोन पिलं आहेत. काही दिवसांपूर्वी कुलगुरू बंगला आणि प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूला बिबट दिसून आला होता. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू

टॅग्स :leopardबिबट्या