लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर हद्दीतील रेखा कॉलनी व स्वावलंबीनगरातील फ्लॅट फोडून चोरांनी मंगळवारी सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. फ्लॅटमध्ये सातत्याने घडणाऱ्या चोऱ्यांमुळे गाडगेनगर हद्दीतील रहिवासी धास्तावले असून, चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे.गाडगेनगर हद्दीत यापूर्वीही सहा ते सात फ्लॅट फोडण्यात आले असून, त्यामध्ये चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्या गुन्ह्यातील आरोपींचा अद्याप छडा लागला नसताना, चोरांनी आणखी मजल मारून मंगळवारी दोन फ्लॅट फोडले. शहरातील एका नामांकित शाळेत प्राध्यापकपदावर असणाºया सारिका ढोले रेखा कॉलनीतील एका सदनिकेत राहतात. त्या व त्यांचे पती हे मंगळवारी आपआपल्या कर्तव्यावर गेले होते.ड्युटी आटोपून सारिका ढोले घरी परतल्या असता, त्यांना घराचे दार उघड दिसले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत पडून असल्याचे आढळून आले. ड्रेसिंग टेबल व बेडरूममधील आलमारीतून सोन्या-चांदीचा ऐवज व रोख असा एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली.सारिका ढोले यांच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनीही घटनास्थळी पाचारण करून तपासकार्य राबविण्यात आले. या घटनेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.स्वावलंबीनगरात कारमधून आले होते तीन इसमदुसरी घटना स्वावलंबीनगरातील साईधाम अपार्टमेंटमध्ये घडली. तेथील रहिवासी मिलिंद सुधाकर गावंडे (४०) हे मंगळवारी सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले. ते परत आल्यानंतर त्यांना दाराचा कडीकोंडा तुटलेला आढळला. चोरांनी त्यांच्या घरातून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा एकूण ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची तक्रार मिलिंद गावंडे यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. या चोरीच्या घटनेत कार क्रमांक एमएच २७ बीएच ५३७९ मध्ये बसून तीन इसम आले; त्यांनी हा मुद्देमाल लंपास केल्याचे गावंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
गाडगेनगर हद्दीतील आणखी दोन फ्लॅट फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:01 IST
गाडगेनगर हद्दीतील रेखा कॉलनी व स्वावलंबीनगरातील फ्लॅट फोडून चोरांनी मंगळवारी सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. फ्लॅटमध्ये सातत्याने घडणाऱ्या चोऱ्यांमुळे गाडगेनगर हद्दीतील रहिवासी धास्तावले असून, चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे.
गाडगेनगर हद्दीतील आणखी दोन फ्लॅट फोडले
ठळक मुद्देपोलिसांना आव्हान : रेखा कॉलनी व स्वावलंबीनगरातील घटना