शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात १०८९ नागरिकांना श्वानदंश, रोज १५ ते २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:29 IST

जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.अमरावती शहरात पाच हजारांवर श्वान आहेत. जिल्ह्यात ही संख्या १० हजारांवर जाते. वर्षभरात श्वानांनी चावा घेतल्याचे सातशे ते आठशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. मात्र, जून व जुलै महिन्यात श्वानदंशाच्या घटना अधिकच वाढल्या. दरवर्षी श्वानांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात श्वानदंशाचे रुग्ण सतत वाढत आहेत. श्वानांनी चावल्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला असून, खेळता-खेळता श्वान अचानक अंगावर धावल्याचे आढळून आले. पावसाळ्याच्या दिवसांत श्वान चावल्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. दोन महिन्यात १०८९ जणांना श्वानाने चावा घेतलेले रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात श्वानांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना अ‍ॅन्टी रॅबीज इंजेक्शन देण्यात येत असून, उपचारानंतर रुग्ण बरे झाले आहेत.बाईकस्वार, लहान मुलांच्या जीविताला धोकाअलीकडे श्वानांचे झुंड वराहाचा पिछा करीत त्यांना फस्त करतात. अन्नाच्या कमतरतेमुळे श्वान मास भक्षणाकडे वळल्याचे दिसत आहे. वराह खाणारे श्वान मानवी सानिध्यात राहतात. त्यामुळे श्वान व वराहातील संसर्ग मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यातच काही श्वान मोटरसायकलीवर भुंकत पाठलाग करतात. त्यामुळे मोटरसायकलस्वार धूम ठोकतात, अशा स्थितीत लहान मुले खेळत बागडत असताना अपघात होण्याची शक्यता बळावते. या श्वानांचा वावर मुलांच्या जिवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो.का चवताळतात श्वानपावसाळ्यात श्वानांचा 'मेटींग सिझन' असतो. सततच्या पावसामुळे श्वानांना खायला अन्न मिळत नाही. त्यातच काही श्वान अन्नाच्या किंवा मेटींगच्या शोधात परिसर बदलतात. अनेकदा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी मोकाट श्वानांना पकडून शहराबाहेर सोडतात. अशा परिस्थितीत श्वान चवताळण्याची शक्यता बळावते. अशाच स्थितीत श्वान मानवी संपर्कात आल्यास तो चावा घेतो.चार श्वानांना 'रॅबीज'गेल्या काही दिवसांत शहरातील वसा संस्थेला रॅबीजचे चार श्वान आढळून आले. त्यांनी याबाबत महापालिकेला माहिती दिली आहे.