शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

धारणीत दोन कोटींचा सोलर लॅम्प घोटाळा

By admin | Updated: December 27, 2014 00:45 IST

मेळघाटात जी रेन्ज सोलर एनर्जी या नावाने चांदूररेल्वे येथील दोन व्यक्तींनी ‘मेडा’ (एमईडीए)ची अधिकृत मान्यता न घेता बोगसरीत्या तालुक्यातील...

राजेश मालवीय धारणीमेळघाटात जी रेन्ज सोलर एनर्जी या नावाने चांदूररेल्वे येथील दोन व्यक्तींनी ‘मेडा’ (एमईडीए)ची अधिकृत मान्यता न घेता बोगसरीत्या तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसह एकूण १०० ग्रामपंचायतींच्या सचिवांशी संगनमत करून शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीचा दुरूपयोग केला. २ कोटी रूपयांचा सोलर लम्प घोटाळा केला. याची तक्रार धारणी पं.स.च्या गटविकास अधिकाऱ्यांसह जि.प. सीईओ व विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विविध स्तरावरून सोलर लँप घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्याने ५० पेक्षा अधिक सचिवांवर निलंबनाची संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात कोठेही सोलर एनर्जी कंपनी उघडण्यासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी येथे २५ लाख रूपये डिपॉझिट भरून त्यांची ‘आरसी’ मान्यता घेण्याचा शासनाचा नियम आहे. मात्र धारणी शहरात चांदूररेल्वे येथील गणेश शिरभाते, अतुल गणेश शिरभाते या व्यक्तींनी ‘एमईडीए’ची अधिकृत आरसी मान्यता न घेता बोगसरीत्या २०१२ मध्ये जी. रेन्ज सोलर एनर्जी नावाने कंपनी उघडून सोलर लँपसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची खरेदी केली. हे भाग तालुक्यातील झिल्पी, शिरपूर, राणी तंबोली, बिजुधावडी, मोगर्दा, भोकरबर्डी, चटवाबोड, जामपाटी, बिरोटी, सावलीखेडा, हिराबंबई, गोलई, दादरा, चाकर्दा, दुनी, कारदा, खापरखेडा, बेरदाबल्डा, राणामालूर, राजपूर, बोबदो १०० ग्रा. पं. च्या सचिवांशी संगनमत करून कोणतीही निविदा, कोटेशन न घेताच येथील जी. रेन्ज सोलर एनर्जी कंपनीने दहा टक्के कमिशनचे आमिष देऊन या कंपनीकडे एमईडीएची आर.सी. (रेट कॉन्ट्रॅक्ट)ची कोणतीही अधिकृत मान्यता नसतानाही २ कोटींचे बोगस सोलर लॅम्प मेळघाटात लावण्यात आले असून ग्रा. पं. सचिवांनी यासाठी १३ वित्त आयोग, तंटामुक्ती निधी, पर्यावरण समृद्धी ग्राम संतुलीत योजना ईत्यादी विकास निधींची कमीशनपोटी विल्हेवाट लावली. निकृष्ट सोलर लॅम्प लावल्याने अनेक गावांत लॅम्प बंद आहेत. प्रत्येकी २० हजार लॅम्पप्रमाणे अतिरिक्त बिले काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. मेळघाटातील सोलर लॅम्प घोटाळ्याची तक्रार येथील गटविकास अधिकाऱ्यांसह सीईओ, विभागीय आयुक्तांना १५ डिसेंबर रोजी प्राप्त होताच विविध स्तरावरून मेळघाटच्या सोलर लँप घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीअंती ५० पेक्षा अधिक ग्राम सचिवावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता बळावली आहे.