गजानन मोहोड अमरावतीदेशाच्या रजिष्टार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाद्वारे सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेमधील धर्मनिहाय लोकसंख्या मंगळवारी जारी केली. यात जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८८ हजार ४४५ इतकी आहे. यामध्ये हिंदू नागरिकांची लोकसंख्या २० लाख ५५ हजार १७७ आहे. हिंदूचा टक्का वाढलेला आहे. जिल्ह्यात प्रत्येक ३ नागरिकांपैकी २ हिन्दू नागरिक असल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यात मुस्लीम लोकसंख्येचाही टक्का वाढलेला आहे, धर्मनिहाय जनगणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख २१ हजार ४१० मुस्लीम नगारिक आहे. ख्रिश्चन लोकसंख्या ७ हजार २२३, शिखांची २ हजार २४२, बौध्द धर्माची लोकसंख्या ३ लाख ८३ हजार ८९१, जैन ११ हजार ३६० लोकसंख्या आहे.
तीन नागरिकांपैकी दोन हिंदू
By admin | Updated: August 29, 2015 00:23 IST