शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या दशक्रियेला गेलेल्या दोन नातवांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

साखळी नदीपात्रातील पाईपमध्ये अडकले, नातेवाइकांचा खटाटोप व्यर्थ मंगरूळ चव्हाळा (अमरावती) : आजीच्या दशक्रिया विधीसाठी खानापूर गवळी (ता. नांदगाव खंडेश्वर) ...

साखळी नदीपात्रातील पाईपमध्ये अडकले, नातेवाइकांचा खटाटोप व्यर्थ

मंगरूळ चव्हाळा (अमरावती) : आजीच्या दशक्रिया विधीसाठी खानापूर गवळी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथून मंगरूळ चव्हाळानजीक साखळी नदीतीरी गेलेल्या दोन नातवांचा पात्रात टाकलेल्या पाईपमध्ये अडकून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाइकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

मनीष दिलीप टोम्पे (२३) व ईश्वर रामराव टोम्पे (२५, दोघेही रा. खानापूर गवळी) अशी मृतांची नावे आहेत. मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावात ममताबाई टोम्पे (७५) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या दशक्रिया विधीकरिता शनिवारी कुटुंबीय गावापासून आठ किमी अंतरावरील साखळी असलेल्या नदीकाठी ऋषी महाराज मंदिरात गेले होते. या साख‌ळी नदीवर निम्म साखळी हे धरण बांधले आहे. या नदीचे पात्र पार करण्यासाठी काही अंतरावर पायली टाकण्यात आली आहे. बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी नदीपात्रातून वाहत आहे. त्यामुळे धरणाखाली नदीपात्रात भोवरा तयार झाला आहे. नदीकाठी आलेले मनीष व ईश्वर यांनी पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र, प्रवाह तीव्र असल्याने ते पुलाच्या सात फुटांच्या गोल पायलीत अडकले. हे लक्षात येताच पूजेला बसलेल्या भाऊ, वडील व नातेवाइकांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी २० मिनिटांपर्यंत केलेले प्रयत्न फोल ठरले. दोघांचे पाय पायलीत घट्ट फसल्याने त्यांना पाण्याच्या वर येता आले नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूचे दु:ख शमलेले नसताना रामराव टोम्पे व दिलीप टोम्पे यांना मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन करावे लागले. याप्रकरणी त्यांनी धरणाच्या अर्धवट बांधणीमुळे ही घटना घडल्याचा आक्रोश व्यक्त केला.

सहायक पोलीस निरीक्षक पडघान यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची कार्यवाही सुरू होती.