शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागे दोन डझन अहवालांचा ससेमिरा

By admin | Updated: January 10, 2015 00:12 IST

विविध उपक्रम राबवा आणि अहवाल पाठवा या शिक्षण विभागाच्या ससेमिऱ्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या कारकून कामात भर पडणार आहे.

अमरावती : विविध उपक्रम राबवा आणि अहवाल पाठवा या शिक्षण विभागाच्या ससेमिऱ्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या कारकून कामात भर पडणार आहे. यंदा वर्षभरात तब्बल २५ नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त उपक्रम राबविण्याच्या सूचना सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग अशा प्रक्रियेनंतर मिळाल्या आहेत.आतापर्यंत शिक्षकांना वर्षभर जवळपास १९ प्रकारचे अहवाल द्यावे लागत होते. त्यात आता भरच पडली आहे. त्यामुळे या कामांची संख्या दोन डझनांवर पोहोचली आहे. यावर्षी एका नेत्याची जयंती केली मग दुसऱ्याची का नाही, अशा वादात अडकलेल्या शासनाने नव्या वर्षी सावधगिरी बाळगत सगळ्या नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला उपक्रम राबविण्याच्या सूचना दिली आहे. जयंती, पुण्यतिथी, विशेष दिवस अशी तब्बल २५ दिवसांची यादी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत उपक्रम राबवायचे असल्यामुळे त्यात शाळा साहजिक आहेतच. त्यामुळे आता वर्षभरातील हे २५ विशेष दिवस आणि त्याचबरोबर बांधकाम, प्रवेश सर्वशिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, माध्यान्ह भोजन, मासिक पत्रक अशी विविध अहवालांची जंत्री शिक्षकांच्या मागे लागणार आहे. त्यातच प्रत्येक शिक्षणाधिकारी आपापल्या जिल्ह्यात चांगले काम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर स्वतंत्रपणे विविध उपक्रम राबविले जातात. त्या सर्वांचे अहवाल शिक्षकांना द्यावेच लागतात. अहवालांमध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले होते याची विस्तृत माहिती द्यावी लागते. त्यामुळे या वर्षात शिकवणे कमी, अहवालावर अधिक भर राहील.असे आहेत वर्षभरातील उपक्रमसावित्रीबाई फुले जयंती, जिजाऊ माँ साहेब जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, यशवंतराव चव्हाण जयंती, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा बसेश्वर जयंती, महाराणा प्रताप जयंती, हिंसाचार विरोधी दिन, राजर्षी शाहू महाराज जयंती, वसंतराव नाईक जयंती, लोकमान्य टिळक जयंती, शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, क्रांतीसिंह नाना पाटील जयंती, सद्भावना दिवस, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती, महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय एकात्मता दिवस, संविधान दिवस.