शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

दोन दिवसांत 'सहाशे कोटी'

By admin | Updated: November 12, 2016 00:07 IST

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनी बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी धाव घेतली.

पाचशे,हजारांच्या नोटा : पैसे भरण्यासाठी गर्दी वैभव बाबरेकर अमरावतीपाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनी बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी धाव घेतली. गुरूवार व शुक्रवार या दोनच दिवसांत जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल ६०० कोटींची रक्कम गोळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा निर्णय जाहीर होताच नागरिकांना मोठा धक्का बसला. प्रत्येकाने स्वत: जवळील पाचशे व हजारांच्या नोटांची मोजणी सुरु केली. या नोटा बँकांमध्ये भरण्याकरिता झुंबड उडाली. मागील काही वर्षांत पाचशे व हजारांच्या नोटांचे चलन सर्वसाधारण झाले होते. मात्र, बहुतांश धनाढ्यांनी पाचशे व हजारांच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करून ठेवल्या आहेत. त्या नोटा त्यांनी घरातच साठवून ठेवल्यामुळे आता या पैशाची नोंद आयकर विभागाकडे सद्धा नाही. हा काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशानेच पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाचशे व हजारांच्या नोटा बॅक खात्यात जमा करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.२८ लाखांवर लोकसंख्या असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात अनेकांजवळ पाचशे व हजारांच्या नोटा आहेत. त्या नोटा बँकेत भरण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरु आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, को-आॅपरेटीव्ह व खासगी अशा एकूण ३३१ बँका आहेत. मागील दोन दिवसांत याबँकांमध्ये पैसे भरण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे पाचशे व हजारांच्या नोटांचा ओढ सतत सुरु आहे. परिणामी या दोन दिवसांत तब्बल ६०० कोटींची रक्कम बँकांमध्ये जमा झाली आहे. दोन दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बँकांमध्ये पैसे जमा झाल्याची स्थिती आहे. पुढच्या काही दिवसांत हाच आकडा १ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन दिवसांत बँकांकडे ‘फिक्स डिपॉझिट’ची संख्याही वाढली आहे. साहेब, शंभराच्याच नोटा द्या...!अमरावती : ‘साहेब चलनातून हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्या आहेत. मी दिवसभर काम केले असून घरी सामान घेऊन जायचे आहे. मला मजुरी देताना शंभराच्याच नोटा द्या’ अशी मागणी रोजंदारीवर काम करणारे बांधकाम मजूर मालकाकडे करू लागले आहेत. पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यामुळे अनेकांना ‘जोर का झटका धीरे से’ लागला आहे. बांधकाम मजूर, रोजदांरीवरील कामगार, भाजीविक्रेते जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर चाप लावण्यासाठी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी हजार, पाचशेंच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या क्रांतीकारी निर्णयाचा फटका भल्याभल्यांना बसला असून दैनंदिन व्यवहार कसे करावेत, ही विवंचना सामान्यांना सतावते आहे. मात्र, मजुरांना दररोज मजुरी देताना सुटे पैसे कोठून आणावेत, असा प्रश्न संबंधितांसमोर निर्माण झाला आहे.चार दिवसांपासून मजुरांना दैनंदिन वेतन देताना मोठी कसरत करावी लागत आहे. जुन्या चलनासाठी बँकामध्ये होणारी गर्दी ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे. तर नवीन नोटा पूर्णपणे चलनात आल्या नाहीत. मजूर जुने चलन घेत नसल्याने समस्येचा सामना करावा लागत आहे.-प्रकाश दातार, बांधकाम कंत्राटदार, बडनेरा.हजार-पाचशेची नोट नको रे दादा !अमरावती : राजकारणाशिवाय पैसा नाही आणि पैशाशिवाय राजकारण नाही, हे समीकरण ज्यांना समजले ते लक्ष्मीपूत्र झाले व त्यांनीच मतदारांना आर्थिक मदत करावी लागते, हे नवख्या राजकीय मंडळींना शिकवले. गरिबांची कामे करीत हे नेते कधी श्रीमंत झाले, हे कुणाला कळलेच नाही. लाखो रूपयांची माया जमविल्याने ते कुठे खर्च करावे, हेही समजत नाही. सध्या नगर पालिकेचा आखाडा तापू लागला आहे. खर्च केल्याशिवाय कार्यकर्ते झेंडा घेऊन फिरत नाहीत. पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने राजकीय मंडळींचे धाबे दणाणले आहेत. काय करायचे या नोटांचे असा प्रश्न पडल्याने ही मंडळी कार्यकर्त्यांना नोटा देण्याचा प्रयत्न करू लागली. पण,नेत्यांपेक्षा कार्यकर्ते हुशार असतात. पाचशे-हजारांची नोट घेण्यास ते स्पष्ट नकार देत आहेत. जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. सगळ्याच पक्षाचे उमेदवार कार्यकर्त्यांना पाचशेच्या पुढच्याच नोटा देतात. परंतु सध्या या नोटा चलनात नसल्याने शंभर रुपयांचे बंडल द्यावे लागणार आहे. सध्या नगर पालिकेच्या प्रचाराची लगीनघाई सुरू असली तरी मतदारांना आता खूश कसे करावे, ही मोठी विवंचना उमेदवारांना भेडसावू लागली आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सर्वाधिक नोटाजिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खातेदारांनी मोठी गर्दी केली असून या बँकांमध्ये दोन दिवसांत कोट्यवधीची रक्कम गोळा झाली आहे.सेंट्रल बँक , स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध३१ बँका असून पाचशे व हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी येथे गर्दी वाढली आहे. दोन दिवसांत सुमारे ६०० कोटींची रक्कम जमा झाली. नोटा बदलण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा. शनिवारपासून एटीएम सुरु होईल. - सुनिल रामटेके, व्यवस्थापक अग्रणी बँक