शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला विशेष रस्ता निधीचे दोन कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: March 12, 2016 00:19 IST

नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी नगराध्यक्ष मनीषा नांगलिया व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,

नगराध्यक्ष नांगलियांचा प्रयत्नांना यश : शहर विकासाला मिळणार गती चांदुर बाजार : नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी नगराध्यक्ष मनीषा नांगलिया व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, मुंबई यांच्याकडून विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी निधी मंजूर झाला आहे. यामुळे रडखलेल्या विकासाला गती मिळणार आहे. चांदूरबाजार नगरपालिकेला गेल्या तीन वर्षांपासून रस्ता अनुदानच प्राप्त न झाल्याने शहरातील अनेक विकासकामे रखडलेली होती. पालिकेला २०१३-१४ साली फक्त ७९ हजार रुपये, सन २०१४-१५ साली १.१० लक्ष रुपये इतके नाममात्र रस्ता अनुदान मिळाले आहे. त्यामुळ शहराचा विकास खुंटला होता. याची गंभीर दखल होत नगराध्यक्षा मनीषा नांगलिया व सत्तारुढ होता. याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा मनीषा नांगलिया व सत्तारुढ नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचाकडे प्रश्न रेटून धरला होता. पालिकेकडे पूर्वीचे १ कोटींची कामे करूनही निधी उपलब्ध नसल्याने कंत्राटदारांची देयके थकीत होती. शहरात एक कोटीची कामे नव्याने सुचविल्याने रस्ता अनुदान योजने अंतर्गत पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.नगराध्यक्षा मनीषा नांगलीया यांनी ३१ डिसेंबर रोजी पालिकेला विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. २४ जानेवारी २०१६ रोजी नगरविकास मंत्री रणजिीा पाटील यांनी पालिकेला दिलेल्या भेटीदरम्यान पालिकेचे नगरसेवक गोपाल तिरमारे, नितीन कोरडे, भैयासाहेब लंगोटे, विशाल तायवाडे, एजाज अली, लविणा अकोलाकर, सुषमा बर्वे, मीनाक्षी औतकर यांनी विशेष मागणी केली होती. त्याची फलश्रृती म्हणून पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची विशेष फलश्रृती मिळाली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ कोटी रुपये निधी पालकंमत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने पालिकेला १७ फेब्रुवारी २०१६ ला मंजूर करण्यात आल्याने शहरातील खुंटलेल्या विकासाला गती मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)चार वर्षांपासून शहरातील प्रलंबित विकासकामे या निधीमुळे मार्गी लागणार आहे. तसेच नागरिकांच्या हिताचे निर्णय मी व माझे सहयोगी नगरसेवक घेऊन शहराच्या विकासाकरिता सर्वोतेपरी प्रयत्न करू. - मनीष नांगलिया, नगराध्यक्षा, चांदूरबाजारपालिकेला शासनातर्फे मिळालेल्या निधीचा शहर विकासाकरिता योग्य वापर व्हावा. पूर्वीच्या रस्त्यांनी सुद्धा मोकळा श्वास घ्यावा, याकरिता नगराध्यक्षासह नगरसेवकांनी प्रयत्न करावा.- दत्तात्रेय किटुकले, नागरिक.